अनेक नेते, सेलिब्रिटींच्या घराची रचना वास्तुशास्त्रानूसार; वास्तुशास्त्राचे पालन केल्याने नेमके काय लाभ?

Written by:Rohit Shinde
Published:
वास्तुशास्त्र हे फक्त अंधश्रद्धा नसून, निसर्ग आणि मानवी जीवन यामधील समतोल राखण्याचे विज्ञान आहे. याचे पालन केल्याने कोणतेही वास्तु अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते.
अनेक नेते, सेलिब्रिटींच्या घराची रचना वास्तुशास्त्रानूसार; वास्तुशास्त्राचे पालन केल्याने नेमके काय लाभ?

भारतात घरे बांधताना अथवा घरांची रचना करता वास्तुशास्त्राचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. खरंतर अनेक बडे राजकारणी, सेलिब्रिटी या वास्तूशास्त्राचे पालन करतात. वास्तुशास्त्र हे भारतातील एक अतिशय प्राचीन शास्त्र आहे, ज्याचा उद्देश घर, दुकान, कार्यालय किंवा कोणतेही वास्तु बांधताना नैसर्गिक ऊर्जा प्रवाहानुसार रचना करणे हा आहे. यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्वांचा समतोल राखण्यावर भर दिला जातो. असे मानले जाते की, वास्तुशास्त्राचे पालन केल्याने घरात समाधान, आरोग्य, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा येते.

वास्तुशास्त्राचे ऐतिहासिक महत्त्व

भारतातील मंदिरांची, राजवाड्यांची आणि प्राचीन नगरींची रचना पाहिल्यास वास्तुशास्त्राचे अनुपालन दिसून येते. मोहनजोदडो, हडप्पा यासारख्या सिंधू संस्कृतीच्या नगररचना अगदी सुव्यवस्थित असून त्यामध्ये पाणी वाहतुकीचे नियोजन, वायुवीजन, पूर्वमुखी घरे, इत्यादी गोष्टी आढळतात. मयमतम्, समरांगण सूत्रधार, इत्यादी ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्राचे शास्त्रशुद्ध विवेचन करण्यात आले आहे.

नेते आणि सेलिब्रिटींकडून नियमांचे पालन

आजकाल अनेक नेते, अभिनेता, उद्योजक, आणि सामान्य लोक देखील त्यांच्या घरांच्या किंवा कार्यालयांच्या रचनेत वास्तुशास्त्राचे पालन करतात. उदाहरणार्थ, बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे घर वास्तु नियमांनुसार सजवले आहे. त्यांच्या मते, घराच्या दिशेनुसार केलेली रचना त्यांच्या यशामध्ये आणि मानसिक शांतीमध्ये मदत करते.

वास्तुशास्त्राचे मूलभूत नियम

  1. मुख्य प्रवेशद्वार – घराचे मुख्य दार पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

  2. स्वयंपाकघर – आग्नेय दिशेला (साउथ-ईस्ट) असावे.

  3. झोपण्याची खोली – नैऋत्य दिशेला (साउथ-वेस्ट) असावी.

  4. देवघर – ईशान्य दिशेला (नॉर्थ-ईस्ट) असावे.

  5. बाथरूम आणि टॉयलेट – वायव्य किंवा पश्चिमेस ठेवणे उत्तम.

वास्तुशास्त्राचे पालन केल्याचे फायदे

वास्तुशास्त्राचे पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात शांतता, प्रेम आणि सौहार्द वाढते. घरातील लोकांचे आरोग्य सुधारते, अशी धारणा देखील यामागे आहे.योग्य रचना केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. घरात धनप्रवेश वाढतो, अपव्यय कमी होतो. घरात वास्तव्यास असणाऱ्यांना मानसिक शांतता आणि यश मिळते. वास्तुनुसार कामाचे ठिकाण ठरवल्यास एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते.

वास्तुशास्त्र हे फक्त अंधश्रद्धा नसून, निसर्ग आणि मानवी जीवन यामधील समतोल राखण्याचे विज्ञान आहे. याचे पालन केल्याने कोणतेही वास्तु अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. हे विज्ञान केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नसून, आज जगभरात त्याचा अभ्यास आणि उपयोग केला जातो. त्यामुळे जर तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा जुने घर पुन्हा सजवत असाल, तर वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन नक्की घ्या.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews