Margashirsha Month 2025 : मार्गशीर्ष महिन्यात काय करावे आणि काय करू नये? चला जाणून घेऊया

Published:
यंदा 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. अशावेळी मार्गशीर्ष महिन्याचे अध्यात्मिक फायदे मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि काय करू नये ?? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Margashirsha Month 2025 : मार्गशीर्ष महिन्यात काय करावे आणि काय करू नये? चला जाणून घेऊया

आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष या पवित्र महिन्याला (Margashirsha Month 2025) खूप महत्त्व आहे.  हा भगवान श्रीकृष्णाच्या पूजेला समर्पित आहे.या महिन्यात स्नान करणे, दान करणे आणि दिवे लावणे यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते. तसेच या महिन्यात केले जाणारे कार्य अत्यंत फलदायी असते. यंदा 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. अशावेळी मार्गशीर्ष महिन्याचे अध्यात्मिक फायदे मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि काय करू नये ?? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मार्गशीर्ष महिन्यात काय करावे? Margashirsha Month 2025

मार्गशीर्ष महिना भगवान हरिचे प्रतीक आहे. म्हणून, दररोज भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची (लाडू गोपाळाची) पूजा करा.

मार्गशीर्ष महिन्यात नदीमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते.  विशेषतः यमुना किंवा गंगा नदीत स्नान करणे हे अमृत स्नानासारखे मानले जाते. यामुळे पापे धुऊन जातात.

मार्गशीर्ष महिन्यात (Margashirsha Month 2025) घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मंदिरात तुळशीच्या झाडाजवळ नियमितपणे दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते.

या महिन्यात, विशेषतः एकादशी आणि पौर्णिमेला गीतेचे पठण केल्याने ज्ञान आणि मोक्ष मिळतो.

मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा कपडे दान करा किंवा तीळ दान करा . यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात.

या महिन्यात शंखाची पूजा करणे आणि शंख फुंकणे घरात शांती आणि समृद्धी आणते, कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे.

मार्गशीर्ष महिन्यात काय करू नये?

मार्गशीर्ष महिन्यात शिळे किंवा थंड अन्न खाऊ नये. फक्त सात्विक आणि ताजे अन्न सेवन करावे.

या महिन्यात दररोज तेल मालिश करणे टाळावे.

या पवित्र महिन्यात कोणाशीही वाईट वागू नका किंवा अपशब्द वापरू नका. तुमचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ ठेवा.

या काळात वाईट गोष्टींपासून दूर राहा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews