देवभूमी उत्तराखंडमध्ये शीर नसलेल्या बाप्पाची का होते पूजा? मुंडकटीया मंदिराची नेमकी काय पौराणिक कथा?

Written by:Rohit Shinde
Published:
जिथे भगवान शंकराने गणपतीचे डोके वेगळे केले, तिथेच हे मुंडकं नसलेले हे मंदीर असल्याचा दावा करण्यात येतो. त्याला नावही तसंच दिलं आहे.
देवभूमी उत्तराखंडमध्ये शीर नसलेल्या बाप्पाची का होते पूजा? मुंडकटीया मंदिराची नेमकी काय पौराणिक कथा?

सर्वत्र सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय, मात्र तुम्हाला उत्तराखंडमधील मुंडकटीया गणेश मंदीरातील बाप्पाच्या मुर्तीबाबत ऐकून नक्कीच धक्का बसेल.  मुंडकटिया म्हणजे मुंडकं नसलेला बाप्पा असंच नाव आहे. हे बाप्पा उत्तराखंडमधील देवभूमीत विराजमान आहेत. गौरीकुंडजवळ हे प्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी विना डोकं असलेल्या केवळ धड असलेल्या बाप्पाचं पुजन केलं जातं.  जगात हे अशा स्वरूपाचे एकमेव मंदीर असल्याचे देखील सांगितले जाते. याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

मुंडकटीया गणेश मंदिराची विशेषता

उत्तराखंड राज्यात अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत, त्यापैकीच एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे मुण्डकटीया गणेश मंदिर. हे मंदिर विशेषतः आपल्या अद्वितीय मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. येथे स्थापित केलेल्या गणेशमूर्तीचे डोके वेगळे असून शरीर वेगळ्या ठिकाणी आहे, त्यामुळे या गणेशाला “मुण्डकटीया गणेश” असे संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाचे मस्तक भगवान शिवांनी क्रोधातून छिन्न केले होते आणि नंतर हत्तीचे मस्तक लावून त्यांना पुनर्जन्म दिला. या घटनाशी संबंधित म्हणून या मंदिराला विशेष महत्त्व आहे.

भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. हे मंदिर केदारनाथच्या मार्गावर असल्याने येथे रोज भाविकांची वर्दळ असते. या भागावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. त्यामुळे येथील सौंदर्य न्याहळतच राहावे वाटते.

गणेश चतुर्थीला भक्तांची मोठी गर्दी

मुण्डकटीया गणेश मंदिर धार्मिक श्रद्धेचे केंद्र मानले जाते. दरवर्षी गणेश चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होते. भक्तांना विश्वास आहे की येथे दर्शन केल्याने अडथळे दूर होतात आणि इच्छापूर्ती होते. मंदिर परिसर डोंगरांच्या निसर्गरम्य वातावरणाने वेढलेला असून शांतता आणि आध्यात्मिक उर्जा यांचा अनुभव मिळतो.

भगवान शंकरांनी श्री गणेशाचे शीर धडावेगळे केल्यानंतर माता पार्वतीने भगवान शंकराला त्या बालकाला पुन्हा जीवित करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर शंकराने त्या मुलाच्या धडावर गणपतीचे म्हणजेच हत्तीचे डोके लावले. त्याला जीवदान दिले. हा बालक म्हणजे गणपती अशी मान्यता आहे. तर जिथे भगवान शंकराने गणपतीचे डोके वेगळे केले, तिथेच हे मुंडकं नसलेले हे मंदीर असल्याचा दावा करण्यात येतो. त्याला नावही तसंच दिलं आहे.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews