Marathi News

Navratri 2025 : नवरात्रीत झाडू बदलल्याने नशीब सुद्धा बदलते; जाणून घ्या त्यामागील रहस्य

Published:
जुन्या झाडू मध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेले असते अशावेळी नवरात्रीच्या काळात तो झाडू बदलून त्याच्या ऐवजी नवीन झाडू वापरणे शुभ मानले जाते. यामुळे घरात आनंद, आरोग्य आणि समृद्धी येते.
Navratri 2025 : नवरात्रीत झाडू बदलल्याने नशीब सुद्धा बदलते; जाणून घ्या त्यामागील रहस्य

सध्याचा काळ हा नवरात्रीचा (Navratri 2025) काळ आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण देशात नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते. नवरात्री दरम्यान अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. यातीलच एक परंपरा म्हणजे झाडू बदलण्याची.. होय, नवरात्रीत झाडू बदलण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. नवरात्रीत झाडू बदलल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते तसेच लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. अनेक धार्मिक विद्वान म्हणतात की नवरात्रात झाडू बदलल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते.

घराची स्वच्छता महत्त्वाची – Navratri 2025

नवरात्रात घराची स्वच्छता करण्याचे विशेष महत्त्व आहे. झाडू बदलणे ही केवळ एक शुद्धीकरण विधी नाही तर ती घरात सकारात्मक ऊर्जा देखील आणते. साहजिकच तुमच्या घरातील लक्ष्मीचा वावर वाढतो.

जुना झाडू बदलणे का महत्त्वाचे?

जुन्या झाडू मध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेले असते अशावेळी नवरात्रीच्या काळात तो झाडू बदलून त्याच्या ऐवजी नवीन झाडू वापरणे शुभ मानले जाते. यामुळे घरात आनंद, आरोग्य आणि समृद्धी येते.

झाडू बदलण्याची योग्य वेळ 

जुना झाडू बदलण्याची योग्य वेळ शनिवार आणि अमावस्या या दिवशी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्याने गरिबी दूर होते आणि आर्थिक संपत्ती वाढते. पैसा नेहमी आपल्या हातात खेळता राहतो तसेच कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होत नाही.  धार्मिकदृष्ट्या, सणांमध्ये झाडू बदलणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. विशेषतः नवरात्राच्या पवित्र दिवसांमध्ये (Navratri 2025) झाडू बदलून नवीन घेतल्याने घरात देवी लक्ष्मीचा कायमचा निवास होतो.

याशिवाय झाडू सकाळी नाही तर संध्याकाळी घरी आणावा असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.  झाडू तुटू लागताच तो ताबडतोब बदलला पाहिजे. झाडू बदलताना “ओम महालक्ष्म्यै नम:” चा जप करणे शुभ मानले जाते. ध्यान आणि मंत्रांसह जा जप घरात समृद्धी आणि आरोग्य आणते.

नवरात्रीतील बदलाचा चमत्कार

तुम्हीही या नवरात्रीत, तुमच्या प्रार्थना आणि उपवासासह, झाडू बदलण्याची परंपरा पाळा. जुना झाडू टाकून द्या आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाचे आणि सकारात्मक उर्जेचे तुमच्या घरात नवीन झाडून वापरायला काढा. तुमच्याही आयुष्यात चांगला बदल झालेला तुम्हांला बघायला मिळेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews