हिंदू धर्मात नवरात्रीला (Navratri 2025) खूप महत्त्व आहे. महिषासुर राक्षसाचा वध करुन देवी दुर्गाने वाईटावर विजय मिळवला होता. याच कारणास्तव देवी दुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. खास करून बिहार, झारखंड, आसाम आणि पश्चिम बंगाल सारख्या उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये नवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावर्षी २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे… तर १ ऑक्टोबरला दसरा असणार आहे. आज आपण नवरात्रीचे ९ दिवस कोणते?? कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घातली जाते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…..
आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देवीचे आगमन होते. प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. यावेळी षष्ठीची तारीख २८ सप्टेंबर रोजी येईल. या दिवसापासून दुर्गा पूजा सुरू होईल, जी पाच दिवस चालेल. या दरम्यान, महाषष्ठी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी आणि विजयादशमी हे उत्सव साजरे केले जातील.
शारदीय नवरात्री 2025 तारीख – Navratri 2025
प्रतिपदा – २२ सप्टेंबर २०२५ – पांढरा रंग (सोमवार )
द्वितीया – २३ सप्टेंबर २०२५ – लाल रंग (मंगळवार)
तृतीया – २४ सप्टेंबर २०२५ – निळा रंग (बुधवार)
चतुर्थी – २५ सप्टेंबर २०२५ – पिवळा रंग (गुरुवार)
पंचमी – २६ सप्टेंबर २०२५ – हिरवा रंग (शुक्रवार)
षष्टी – २७ सप्टेंबर २०२५ – राखाडी रंग (शनिवार )
सप्तमी – २८ सप्टेंबर २०२५ – केशरी रंग (रविवार)
अष्टमी – २९ सप्टेंबर २०२५ – मोरपंखी रंग (सोमवार
नवमी – ३० सप्टेंबर २०२५ – गुलाबी रंग (मंगळवार)
घटस्थापना शुभ मुहूर्त
नवरात्रीची सुरुवात होते घटस्थापना, जी खूप शुभ मानली जाते. यावर्षी घटस्थापना सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी केली जाईल. सकाळी ०६:०९ ते सकाळी ०८:०६ हा मुहूर्त घटस्थापना साठी शुभ मानला जात आहे.
काय आहे नवरात्रीचे महत्त्व?
१) असे मानले जाते की या दिवसांत देवी दुर्गा पृथ्वीवर येतात आणि तिच्या भक्तांचे दुःख दूर करतात.
२) नवरात्री म्हणजे हा आत्मशुद्धी आणि ध्यानाचा काळ मानला जातो.
३) नवरात्री निमित्त देशभरात गरबा, दांडिया, रामलीला आणि दुर्गा पूजा असे कार्यक्रम आयोजित केले जातात, जे समाजाला एकत्र आणतात.
४) दसरा हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय दर्शवितो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






