नवरात्रीमध्ये करा ४ वास्तु उपाय, घरात होईल धनधान्याचा वर्षाव, दूर होतील समस्या

Published:
नवरात्रीमध्ये काही वास्तु उपायसुद्धा केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये काही वास्तु उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येऊन सुखसमृद्धी येते.
नवरात्रीमध्ये करा ४ वास्तु उपाय, घरात होईल धनधान्याचा वर्षाव, दूर होतील समस्या

Navratri Vastu Tips:    हिंदू धर्मानुसार दरवर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रौत्सवाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. देवी दुर्गा मातेचा प्रत्येक रूपात आशीर्वाद घेतला जातो. भक्त मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अगदी भक्तिभावाने आणि आनंदाने देवीची पूजा करत असतात.

दरम्यान नवरात्रीमध्ये काही वास्तु उपायसुद्धा केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये काही वास्तु उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येऊन सुखसमृद्धी येते. तसेच घर धनधान्याने भरून जाते. हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक कार्य केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच आज आपण नवरात्रीत कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊया……

 

घराची उत्तर दिशा-

वास्तु शास्त्रानुसार घराची उत्तर दिशा अत्यंत महत्वाची असते. या दिशेला देवी-देवतांची दिशा म्हटले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये घराची उत्तर दिशा अगदी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसे तर नेहमीच उत्तर दिशेला स्वच्छता ठेवावी. परंतु नवरात्रीत खास लक्ष द्यावे. असे केल्याने घरातील वादविवाद आणि भांडणे दूर होतात. घरात सुखसमृद्धी येते.

तुळशी पूजा-
नवरात्रीमध्ये धनधान्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी करण्यासाठी सकाळ-सायंकाळ तुळशीची पूजा करावी. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत महत्व आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप समजले जाते. त्यामुळे सकाळ-सायंकाळ तुळशीसमोर दीप प्रज्वलित केल्याने धनधान्याची कमतरता दूर होऊन आर्थिक स्थैर्य येते.

अंधार ठेऊ नका-
वास्तु शास्त्रानुसार घरात नेहमीच प्रकाश असावा. घरातील कोणताही कोपरा अंधारात राहू नये. कारण माता लक्ष्मी अंधार असलेल्या ठिकाणी निवास करत नाही.त्यामुळे नवरात्रीमध्येही घरात कोणत्याच कोपऱ्यात अंधार राहू देऊ नका नेहमीच प्रकाश राहू द्या.

 

दुर्गा मातेजवळ दीप प्रज्वलित करा-

नवरात्रीमध्ये नेहमीच सकाळ-सायंकाळ देवी दुर्गा मातेजवळ दीप प्रज्वलित करा. असे केल्याने माता प्रसन्न होते. तुमच्या घरातील अडचणी दूर होतात. घरात सुखसमृद्धी येते. घरात आर्थिक भरभराटी होऊन आर्थिक स्थिती सुधारते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews