यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून (Navratri 2025) सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीला नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. नवरात्रीत केलेल्या देवी पूजनामुळे सुख समृद्धी शांती आनंद कीर्ती समाधान आणि वैभव प्राप्त होते. दुसरीकडे,वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, व्रत आणि उत्सव शुभ आणि राजयोग निर्माण करतात. त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो.
जस मी सांगितलं की यंदा यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि २ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. याच दरम्यान चंद्र ग्रह तुळ राशीमध्ये प्रवेश करेल ज्या ठिकाणी आधीच मंगळ स्थित आहे… अशावेळी तूळ आणि मंगळच्या युतीमुळे एक महाशक्तिशाली राजयोग बनणार आहे… या राजयोगाचा लाभ काही राशींना मिळणार आहे त्यांना धनप्राप्ती सुद्धा अचानकपणे होऊ शकते आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. या राशी नेमक्या आहेत तरी कोणत्या ते आज आम्ही तुम्हाला सांगतो.
1) मकर रास – Navratri 2025
यंदाची नवरात्री मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय खास आणि लाभदायक ठरू शकते. तुम्ही जर नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो…. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात वाढ होईल. तुमच्या शत्रूंवर तुम्ही मात करू शकता. या काळात प्रवास करण्याची संधी मिळू शकते…
2) तुळ रास
यंदाची नवरात्री तूळ राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वपूर्ण राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल… मित्रांसोबत गोडवा वाढेल…. नवरात्रीच्या काळात तुम्हाला नवीन प्रेम मिळू शकते. जर तुमचं लग्न झालं असेल तर या काळात तुमचा संसार आणखी बहरेल. तुम्ही जर लग्नासाठी स्थळे शोधत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे.
3) कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांनाही यंदा दुर्गादेवी चांगलीच पावणार आहे. दुर्गादेवीच्या काळात तुमचे नशीब तुम्हाला चांगले साथ देणार आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर त्या ठिकाणी बढती मिळण्याची किंवा पगार वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात जाण्याचा योग आहे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






