Which zodiac sign will be lucky in Navratri: हिंदू पंचागानुसार येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. लवकरच दुर्गा माता विराजमान होणार आहे. मातेच्या स्वागताची जवळपास सर्व तयारी झाली आहे. नवरात्रयीच्या या नऊ दिवसांत देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. भक्त नऊ दिवस उपवास करतात. तसेच नवरात्रीदरम्यान विविध नियमांचे पालन करतात. देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी सर्वजण भक्तिभावाने पूजा करतात.
ज्योतिषशास्त्राच्या मते यंदाची नवरात्री काही राशींसाठी खास असणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस काही राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहेत. या नवरात्रीमध्ये काही राशींना देवी दुर्गा मातेसोबतच शनी देवाचीसुद्धा कृपादृष्टी लाभणार आहे. त्यामुळे ही नवरात्री त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे.
शनी गोचर-
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत स्थान बदल करत असतात. ग्रहांच्या हा संक्रमणाचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. वर्षभरात सतत ग्रह आपली चाल बदलत असतात. दरम्यान सध्या शनी देव मीन राशीत विराजमान आहेत. शनी देवाच्या मीन राशीत असण्याने काही राशींवर सकारात्मक आणि काही राशींवर नकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. आज आपण नवरात्रीमध्ये शनी देवाची कृपादृष्टी लाभणाऱ्या राशी नेमक्या कोणत्या आहेत त्याबाबत जाणून घेऊया….
वृषभ-
नवरात्रीदरम्यान वृषभ राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपादृष्टी लाभणार आहे. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने विविध क्षेत्रात यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. तसेच शत्रूंवर आणि प्रतिस्पर्धीवर विजय मिळवाल. मानसिक त्रासातून आराम मिळेल. व्यवसाय-उद्योगात चांगला नफा होऊन आर्थिक लाभ मिळेल. शनी देवाच्या कृपेने समाजात तुम्हाला मानसन्मान आणि आदर मिळेल. अचानक धनलाभ होऊन तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. चांगल्या लोकांची संगत लाभेल. ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा नव्याने चालू लागेल. घरात सुखसमृद्धी येईल.
तूळ-
नवरात्रीमध्ये तूळ राशीच्या लोकांना शनी देवाची कृपादृष्टी लाभेल. तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होईल. तुमच्या स्पर्धकांच्या मनात तुमच्याबद्दल भीती निर्माण होईल. त्याचा तुम्हाला फायदाच होईल. समाजात मानसन्मान लाभेल. शासकीय कामकाजातून लाभ मिळेल. भावंडांमध्ये आपापसांत प्रेम आणि आपुलकी वाढेल. राजकीय स्थरावर मानसन्मान मिळेल. जुनाट आजारांपासून आराम मिळेल. कर्जापासून सुटका मिळेल. घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता येईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






