What to eat during Navratri: देशभरात सध्या नवरात्रीची जय्यत तयारी दिसून येत आहे. भक्तांना दुर्गा मातेच्या आगमनाची प्रतीक्षा लागून आहे. शारदीय नवरात्रोत्सव देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याकाळात देवीची नऊ शक्तिरूपे आपल्याला पाहायला मिळतात. यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. या नऊ दिवसांत नऊ रंगांना विशेष महत्व आहे. तसेच उपवासालादेखील अत्यंत महत्व आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास केले जातात. याकाळात उपवास करण्याचे काही धार्मिक नियम आहेत. काय खावे काय खाऊ नये याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज आपण नवरात्रीच्या नऊ दिवस खाण्यापिण्याचे कोणते नियम पाळायचे याबाबत आपण जाणून घेणार आहोत. चला पाहूया नवरात्रीच्या उपवसादरम्यान काय खावे आणि काय खाणे टाळावे…..
नवरात्रोत्सवाच्या उपवसादरम्यान ‘या’ पदार्थांचे सेवन करा-
नवरात्रीच्या नऊ दिवस फळांचा आहार करा.
या नऊ दिवसांत फक्त सैंधव मिठाचा वापर करा.
यादरम्यान तुम्ही जिरे पावडर, काळी मिरी पावडर, हिरवी वेलचीची पूड इत्यादींचा वापर करू शकता.
भाज्यांमध्ये तुम्ही बटाटा, टोमॅटो, दोडका, काकडी, अरबी, भोपळा इत्यादी खाऊ शकता.
तसेच नवरात्रीदरम्यान तुम्ही दूध, तूप, दही, पनीर हे पदार्थसुद्धा खाऊ शकता.
तुम्ही नऊ दिवसांत कुट्टूच्या पिठापासून बनलेले पदार्थ तसेच साबुदाण्यापासून बनलेले पदार्थ खाऊ शकता.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत काय खाणे टाळावे?
नवरात्रीच्या नऊ दिवसांत अजिबात साध्या मिठाचा वापर करू नये.
या नऊ दिवसांत गहू, तांदूळ सारख्या धान्याचे सेवनही करू नये.
कांदा-लसूणसारखे तामसिक पदार्थसुद्धा अजिबात खाऊ नयेत.
वांगी, मशरूम आणि पालकसारख्या भाज्यांचे सेवन करू नये.
नवरात्रीमध्ये हेसुद्धा नियम पाळावेत-
नवरात्रीच्या नऊ दिवसांत सर्वांनीच तामसिक आहार, मद्यपान, मांसाहार यांसारख्या पदार्थांचे सेवन करनं टाळावे. या नऊ दिवसात शरीराची योग्य स्वच्छता ठेवावी. तसेच पूर्ण भक्तिभावाने देवीची पूजा करावी.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






