Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण का खाऊ नये? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

Published:
असे मानले जाते की राहू आणि केतू अजूनही मानवी जीवनात त्रास आणि नकारात्मक प्रभाव निर्माण करतात. म्हणूनच, नवरात्रीत त्यांचे सेवन करू नये असे सांगितले जाते.
Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण का खाऊ नये? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

येत्या सोमवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबर पासून नवरात्री उत्सवाला (Navratri 2025) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण देशात नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती करणारे मानले जातात. नवरात्रीच्या काळात जेवणाच्या पदार्थांमध्येही काही नियमांचे पालन करणे गरजेचे मानले जाते. यामध्ये खास करून कांदा आणि लसूण खाण्यास मनाई करण्यात आली आहे .परंतु यामागील नेमकं कारण काय आहे?? नवरात्रीमध्ये लसूण आणि कांदा का खाऊ नये हे तुम्हाला माहिती आहे का?? चला तर या मागील पौराणिक कथा आज आम्ही तुम्हाला सांगतो.

लसूण आणि कांद्यामागील पौराणिक कथा

पुराणांनुसार, कांदा आणि लसूण राहू आणि केतूशी संबंधित आहेत. अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथनाच्या वेळी, एका असुराने देवतांच्या गटात सामील होऊन अमृत प्यायले. भगवान विष्णूने त्याला ओळखले आणि त्याचवेळी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. असुरांचे डोके राहू म्हणून पृथ्वीवर पडले आणि त्याचे धड केतू म्हणून पडले, ज्यामुळे कांदे आणि लसूण निर्माण झाले. असे मानले जाते की राहू आणि केतू अजूनही मानवी जीवनात त्रास आणि नकारात्मक प्रभाव निर्माण करतात. म्हणूनच, नवरात्रीत त्यांचे सेवन करू नये असे सांगितले जाते.

नवरात्रीत काय काय करू नये – Navratri 2025

फक्त लसूण आणि कांदाच नव्हे तर नवरात्रीत अशाही अनेक गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजेत असे बोललं जातं .

नवरात्रीच्या काळात जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नये.

नवरात्रीच्या काळात मासे, अंडी, मटन, चिकन यांसारखे पदार्थ खाऊ नयेत.

नवरात्रीच्या उपवासात हळद आणि आंबट पदार्थ खाण्यास मनाई असते. (Navratri 2025)

याशिवाय नवरात्रीच्या काळात धान्ये आणि डाळी, गहू, तांदूळ, बेसन, रवा, रिफाइंड पीठ आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी खाऊ नयेत.

शारदीय नवरात्री 2025 तारीख – 

प्रतिपदा – २२ सप्टेंबर २०२५ – पांढरा रंग (सोमवार )
द्वितीया – २३ सप्टेंबर २०२५ – लाल रंग (मंगळवार)
तृतीया – २४ सप्टेंबर २०२५ – निळा रंग (बुधवार)
चतुर्थी – २५ सप्टेंबर २०२५ – पिवळा रंग (गुरुवार)
पंचमी – २६ सप्टेंबर २०२५ – हिरवा रंग (शुक्रवार)
षष्टी – २७ सप्टेंबर २०२५ – राखाडी रंग (शनिवार )
सप्तमी – २८ सप्टेंबर २०२५ – केशरी रंग (रविवार)
अष्टमी – २९ सप्टेंबर २०२५ – मोरपंखी रंग (सोमवार)
नवमी – ३० सप्टेंबर २०२५ – गुलाबी रंग (मंगळवार)

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews