Marathi News

Navratri Special Famous Temples : काय सांगता!! चक्क दुर्गादेवीच्या मूर्तीतून आवाज येतोय?? भाविकांनी चमत्कार पहाच….

Published:
असे म्हटले जाते की या मंदिरातील मूर्ती त्यांच्या आवाजांसाठी ओळखल्या जातात. रात्रीच्या वेळी तिथून जाणाऱ्या लोकांना अनेकदा असे वाटते की मूर्ती एकमेकांशी बोलत आहेत.
Navratri Special Famous Temples : काय सांगता!! चक्क दुर्गादेवीच्या मूर्तीतून आवाज येतोय?? भाविकांनी चमत्कार पहाच….

सध्या आपण २१ व्या शतकात असून आणि आधुनिक वैज्ञानिक युगात राहत असलो अशी अनेक रहस्ये आहेत जी विज्ञानाला सुद्धा उलगडलेली नाहीत. … देवाच्या मंदिरात सुद्धा ( Navratri Special Famous Temples) असे अनेक चमत्कार बघायला मिळतात ज्यामागच रहस्य शोधून काढणे शास्त्रज्ञांना सुद्धा शक्य झालेलं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्काराबद्दल सांगणार आहोत…..जो चमत्कार दुर्गामातेच्या मंदिरात घडत आहे…. आपल्या भारतात दुर्गादेवीचे असे एक मंदिर आहे, जिथे दुर्गा मातेच्या मूर्तीतून चक्क आवाज निघतोय…. होय वाचायला आणि ऐकायला जरी खरं वाटत नसलं तरीही ही एक खरी गोष्ट आहे…

आम्ही तुम्हाला ज्या मंदिरातील मूर्तीबद्दल सांगतोय, त्या मंदिराचे नाव आहे राज राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी मंदिर… हे मंदिर बिहार मध्ये आहे. असे म्हटले जाते की या मंदिरातील मूर्ती त्यांच्या आवाजांसाठी ओळखल्या जातात. रात्रीच्या वेळी तिथून जाणाऱ्या लोकांना अनेकदा असे वाटते की मूर्ती एकमेकांशी बोलत आहेत. सुरुवातीला, लोक याला भ्रम मानत होते, परंतु जेव्हा शास्त्रज्ञांनी तपास केला तेव्हा ते देखील या रहस्यमय घटनेला नाकारू शकले नाहीत.

मूर्तीतून आवाज कसा काय निघतो??  Navratri Special Famous Temples

मंदिराच्या रचनेमुळे आवाज बराच काळ प्रतिध्वनीत राहू शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे. दिवसा बोलले जाणारे शब्द सूक्ष्म स्वरूपात जतन केले जातात आणि रात्री प्रतिध्वनी म्हणून ऐकू येतात. हे केवळ एक अनुमान असले तरी, स्थानिकांचा असा विश्वास आहे की तांत्रिक शक्तींच्या प्रभावामुळे देवी येथे सक्रिय राहतात.

४०० वर्षे जुने प्राचीन मंदिर

हे मंदिर सुमारे ४०० वर्षे जुने आहे (Navratri Special Famous Temples). तांत्रिक भवानी मिश्राने त्याची स्थापना केली होती. त्यांचे वंशज अजूनही पुजारी म्हणून काम करतात. हे ठिकाण विशेषतः तांत्रिक पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे भेट देणारे भाविक असा विश्वास करतात की देवी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

प्रमुख देवता आणि इतर मूर्ती

मंदिराची मुख्य देवता राज राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी आहे. तिच्यासोबत, बगलामुखी माता, तारा माता, दत्तात्रेय भैरव, बटुक भैरव, अन्नपूर्णा भैरव, काल भैरव आणि मातंगी भैरव यांच्या मूर्ती देखील येथे स्थापित आहेत. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथे काली, त्रिपुरा भैरवी, धुमावती, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, मातंगी, कमला, उग्र तारा आणि भुवनेश्वरी देवी या दहा महाविद्यांच्या मूर्ती आहेत. म्हणूनच हे स्थान अत्यंत पवित्र आणि तांत्रिक पद्धतींचे पालन करणाऱ्यांसाठी श्रद्धेचे केंद्र मानले जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews