Navratri Special : मुंबईतील या मंदिरात नाणे चिकटल्यास पूर्ण होते भाविकांची इच्छा

Published:
या मंदिराच्या गर्भामध्ये महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या तीन देवीच्या मूर्ती एकत्र आहे. तिन्ही मूर्ती सोन्याच्या बांगड्या आणि हारांनी सजवलेल्या आहे.
Navratri Special : मुंबईतील या मंदिरात नाणे चिकटल्यास पूर्ण होते भाविकांची इच्छा

यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून (Navratri Special) सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीला नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. नवरात्रीत केलेल्या देवी पूजनामुळे सुख समृद्धी शांती आनंद कीर्ती समाधान आणि वैभव प्राप्त होते. नवरात्रीच्या काळात अनेक लोक हे देवीच्या मंदिरात जातात. अशातच मुंबईतील एक महालक्ष्मीचे मंदिर आहे. या मंदिराची खास बाब म्हणजे या मंदिरात एक भिंत आहे. ज्यावर तुम्हाला अनेक दाणे दिसतील. असे म्हणतात की, जर ही नाणी भिंतीवर चिकटली तर देवी त्यांची इच्छा पूर्ण करते.

कुठे आहे मंदिर – Navratri Special

मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे सर्वाच प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावर हे महालक्ष्मीचे मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भामध्ये महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या तीन देवीच्या मूर्ती एकत्र आहे. तिन्ही मूर्ती सोन्याच्या बांगड्या आणि हारांनी सजवलेल्या आहे. तसेच हे मंदिर दिसायला अत्यंत सुंदर आहे. दारापाशी सुंदर कोरीव कामही केलेले आहे. या ठिकाणी विविध देवतांचे आकर्षक पुतळे देखील पाहायला मिळतात.

काय आहे इतिहास –

मंदिराला (Navratri Special) खूप मोठा इतिहास आहे. आणि तो इतिहास देखील खूपच रंजक आहे. ब्रिटिशांनी महालक्ष्मी प्रदेश वरळी प्रदेशाला जोडण्यासाठी ब्रीच मार्ग बनवण्याची योजना केली होती. त्यावेळी समुद्राच्या वादळी या कामात सारखी विघ्न येत होती. त्यावेळी देवी लक्ष्मी एक ठेकेदार रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात आली. आणि समुद्राच्या देवीच्या ती मूर्ती काढून मंदिर स्थापन करण्याचा आदेश दिला. रामजी यांची तसेच केले आणि यशस्वीरिता ब्रीच तयार झाला.

या देवीला संपत्तीची देवी देखील मानले जाते. तुमच्या घर आणि व्यवसायात सुख-समृद्धी घेण्यासाठी अनेक लोक महालक्ष्मीची पूजा करतात. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा आई पूर्ण करत असते. भाविक महालक्ष्मी चा मुखवटा पाहू शकत नाही. कारण दिवसा त्या मूर्तीवर मुखवटा चढवलेला असतो. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मूळ मूर्ती पाहण्यासाठी रात्री यावे लागते देवीवर अनेकांची खूप श्रद्धा आहे. रात्री या देवीचा मुखवटा चढवल्यानंतर दरवाजा बंद होतात. आणि सकाळी स्वच्छता झाल्यानंतरच देवींचा अभिषेक होतो. आणि त्यानंतर भक्तांना दर्शन दिले जाते.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews