भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होऊन अमावास्येपर्यंत काळ म्हणजे पितृपक्ष (Pitru Paksha 2025)….. हिंदू धर्मात, देव-देवतांच्या पूजेव्यतिरिक्त, पूर्वजांच्या पूजेचेही विशेष महत्त्व आहे. 15 दिवसांच्या या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की पितृपक्षात पितरांना श्राद्ध अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. या वर्षी श्राद्ध पक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि २१ सप्टेंबरपर्यंत चालेल.
पितृदोष हा एक न दिसणारा अडथळा –
पितृदोष हा एक न दिसणारा अडथळा आहे अशी धार्मिक श्रद्धा आहे, हा अडथळा पूर्वजांच्या रागामुळे येतो. पूर्वजांच्या क्रोधाची अनेक कारणे असू शकतात. हे तुमच्या आचरणामुळे, कुटुंबातील एखाद्या सदस्याने केलेली चूक, श्राद्ध इत्यादी विधी न करणे, अंत्यसंस्कारातील कोणतीही चूक इत्यादींमुळे देखील असू शकते. अशावेळी देव-देवतांची कितीही पूजा, प्रार्थना केली तरी शुभ परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे पितृदोषातून मुक्त होण्यासाठी उपाय काय करावे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Pitru Paksha 2025
पितृदोषातून मुक्त होण्यासाठी उपाय- Pitru Paksha 2025
पितृदोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करावे.
पितृ दोष दूर करण्यासाठी तर्पण विधी सांगीतला जातो .सर्वपित्री आमावस्येला किंवा पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून तुमच्या पित्रांना तर्पण देऊ शकता. असं मानलं जातं की काळे तीळ हे यमराजांना खूप प्रिय असतात. त्यामुळे पितृ दोष दूर होण्यास मदत होते.
भगवान शिवाच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर बसून किंवा घरी भगवान शिवाचे ध्यान करून “ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय च धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्.हा मंत्र म्हणा.
पिंडदान, सर्पपूजा, ब्राह्मणाला गाय दान, कन्यादान, विहीर, पायऱ्या, तलाव इत्यादी बांधणे
पितृपक्षात दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते
पितृ पक्षामध्ये दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा. यामुळे पितृदोषही दूर होतो
अमावस्येला पूर्वजांसाठी शुद्धतेने तयार केलेले अन्न खाऊन आणि गायीला भात, साखर चूर्ण, तूप आणि एक भाकरी खाऊ घालून पितृदोष शांत होतो.
पितृ पंधरवाड्यामध्ये येणाऱ्या इंदिरा एकादशीला उपवास करा. या दिवशी भगवान विष्णूंना काळे तीळ अपर्ण करा. यामुळे देखील पितृ दोष दूर होण्यास मदत होते असं म्हंटल जाते.
आपल्या पालकांचा, वडिलांचा, सर्व महिलांचा आदर करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






