हिंदू धर्मात, देव-देवतांच्या पूजेव्यतिरिक्त पितृ पक्षालाही विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होऊन अमावास्येपर्यंत काळ म्हणजे पितृपक्ष (Pitru Paksha 2025)….. यंदाचा पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि २१ सप्टेंबरपर्यंत चालेल. 15 दिवसांच्या या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते.असे मानले जाते की पितृपक्षात पितरांना श्राद्ध अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पितृपक्षात काही वास्तू उपाय केल्याने सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदू शकते आणि तुमची आर्थिक भरभराट होऊ शकते यासाठी नेमका काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…..
पूजेच्या ठिकाणाची योग्य दिशा – Pitru Paksha 2025
वास्तुशास्त्रानुसार, घरातील पूजास्थळ नेहमीच पूर्व किंवा उत्तर दिशेने असले पाहिजे, कारण या दिशांमधून शुभ आणि सकारात्मक ऊर्जा वाहते. पितृपक्षाच्या काळात पूजास्थळावर दिवा लावणे आणि पूर्वजांच्या फोटोला फुले अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात.
घरात स्वच्छता ठेवा
स्वच्छता ही नेहमीच महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे…. घरात स्वच्छता असेल तर घरातील वातावरण सकारात्मक राहते परंतु गोंधळ आणि घाण असेल तर नकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत मानले जाते. पितृपक्षात घराचा प्रत्येक भाग, विशेषतः घरातील देव्हारा, मुख्य दरवाजा आणि ईशान्य दिशा पूर्णपणे स्वच्छ करावी. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते.
पाण्याची व्यवस्था कुठे असावी
आणि म्हणजे जीवन आणि वास्तुशास्त्रांमध्ये पाण्याचा संबंध थेट सकारात्मक ऊर्जेची जोडला गेला आहे. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला पाण्याची व्यवस्था असेल तर घरात सकारात्मक वातावरण राहते. पितृपक्षात पाण्यात थोडे मीठ घालून ते मुख्य दरवाजा किंवा पूजास्थळी अर्पण केल्यास ते शुभ मानले जाते आणि घरात सुख समृद्धी आणि भरभराटी नांदते
फुटक्या वस्तू घरात ठेवू नका
अनावश्यक वापरात न असणाऱ्या आणि फुटलेल्या वस्तू घरात असतील तर घरात नकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता असते. अशावेळी पितृपक्षात अशा वस्तू घराच्या बाहेर ठेवणे कधीही शुभ मानले जाते…. फुटक्या वस्तू घराबाहेर टाकून दिल्याने तुमचे घर तर स्वच्छ दिसेलच याशिवाय तुमच्या घरात सकारात्मक वातावरण राहील.
पितृपक्षात दानधर्म करावा
दानधर्म करणे ही कधीही वाया न जाणारी गोष्ट आहे…. दानधर्म केल्याने मनुष्याला पुण्य लागते खास करून पितृपक्षाच्या काळात गरजूंना धान्य पुरवणे कपडा लता देणे किंवा पैसे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते…. दुसऱ्याला दान केल्याने आपल्या घराची संपत्ती वाढते सुख शांती आणते आणि आर्थिक भरभराट होते…. पितृपक्षात दान धर्म केल्याने आपली पूर्वजही खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






