दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षा बंधन साजरी केली जाते. हा बहीण-भावाचा सण आहे. या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. भावाला ओवाळते. यंदाही रक्षाबंधन कधी आहे? आणि मुहूर्त कधी आहे? जाणून घेऊया…
रक्षाबंधन कधी आहे?
हिंदू पंचागानुसार, यावर्षी श्रावणी पौर्णिमेची तिथी 8 ऑगस्टला दुपारी 02 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि 9 ऑगस्टला दुपारी 01 वाजून 24 मिनिटापर्यंत असेल. शास्त्रानुसार, कोणताही उत्सव उदयातिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे.
भद्राकाळात राखी का बांधू नये?
धार्मिक मान्यतेनुसार, भद्राकाळ हा अशुभ मानला जातो. त्यामुळे, या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते, विशेषतः रक्षाबंधन. भद्राकाळात राखी बांधल्यास भावाला अशुभ परिणाम भोगावे लागतात.
आरतीची थाळी अशी तयार करा
रक्षाबंधनाच्या दिशी आरतीच्या थाळीत चंदन आवश्यक ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकु, अक्षता, दही सुद्धा ठेवा. कुंकु आणि अक्षतांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावा. त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)