Raksha Bandhan 2025 : राखी खरेदी करताना या चुका करू नका, अन्यथा भाऊ-बहिणीच्या नात्याला लागेल नजर

Written by:Smita Gangurde
Published:
आपल्या भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, या चुका अजिबात करू नका.
Raksha Bandhan 2025 : राखी खरेदी करताना या चुका करू नका, अन्यथा भाऊ-बहिणीच्या नात्याला लागेल नजर

भाऊ-बहिणीमधील नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. देशभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. सध्या बहीण-भावांची तयारी सुरू झाली आहे. बाजारांची विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी पाहायला मिळत आहेत. रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुखी आयुष्य आणि यशस्वी भविष्याची इच्छा व्यक्त करते. तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षेचं वचन देतो.

राखी खरेदी करताना काय काळजी घ्याल?

भाऊ-बहिणीमधील हा उत्सव यंदा ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. बहीण आपल्या भावांसाठी सुंदर सुंदर राख्या निवडून घेतात. आपल्या भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हव्या. अशा चुका अजिबात करू नका. अन्यथा भाऊ-बहिणींमध्ये नात्यात दुरावा येऊ शकतो.

जुन्या राख्या खरेदी करू नये. याशिवाय राखीवरील चित्र तुटलं असेल तर अशाही राख्या घेणं टाळा. अशी राखी भावाला बांधता येत नाही. यामुळे अशुभ परिणाम होतो. अनेकदा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर देवांचे फोटो, प्रतिक किंवा गणपती बाप्पा, श्रीकृष्ण किंवा अन्य देवतांच्या प्रतिमा असलेली राखी बांधतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार भावांना अशा प्रकारच्या राखी बांधू नये. हा देवाचा अपमान मानला जातो. यामुळे भावांवर नकारात्मक परिणाम होतो.

भावांना काळ्या रंगाची राखी बांधू नये…

हिंदू धर्मात काळा रंग नकारात्मकतेचे लक्षण म्हणून मानला जातो. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावाच्या मनगटावर काळा धागा बांधू नका. जर तुम्ही असे केले तर तुमच्या आणि तुमच्या भावामध्ये वाद होऊ शकतो. नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. याशिवाय प्लास्टिक किंवा सिंथेटिक राख्या दिसायला आकर्षक वाटत असल्या तरी याचा सकारात्मक परिणाम होत नाही. प्लास्टिकची राखी पर्यावरणासाठी धोकादायक आहे, याशिवाय भावावरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासाठी अशा राख्या बांधणं टाळा

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us :GoogleNews