Raksha Bandhan 2025 : भावाला राखी बांधताना तीन गाठी का मारतात? यामागील मान्यता काय आहे?

Written by:Smita Gangurde
Published:
तुम्ही या एका गोष्टीकडे लक्ष दिलंय का कधी? बहीण भावाला राखी बांधताना तीन गाठी मारते. मात्र असं का केलं जातं?
Raksha Bandhan 2025 : भावाला राखी बांधताना तीन गाठी का मारतात? यामागील मान्यता काय आहे?

भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन यंदा ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तीचं रक्षण करण्याचं वचन देतो. तुम्ही या एका गोष्टीकडे लक्ष दिलंय का कधी? बहीण भावाला राखी बांधताना तीन गाठी मारते. मात्र असं का केलं जातं?

राखीला तीन गाठी मारण्याचं महत्त्व…

राखीला तीन गाठी मारण्यामागे मान्यता लपलेली आहे. तीन गाठी त्रिदेव – ब्रम्हा-विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे. पहिली गाठ ब्रम्हाला समर्पित असते जो सृष्टीचा निर्माता आहे. ज्यामुळे चांगली सुरुवात आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते.

दुसरी गाठ भगवान विष्णूला समर्पित केली जाते. जो जगाचा पालनकर्ता आहे. यामुळे भावाची रक्षा, समृद्धी आणि चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. तिसरी गाठ शंकराला समर्पित असल्याचं मानलं जातं. शंकर हा संहारक आणि मोक्षदाता आहे. ही गाठ वाईट शक्तींपासून सुरक्षा प्रदान करते.

या शिवाय तीन गाठी भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि सुरक्षेचं प्रतीक मानली जातात. जेव्हा बहीण या गाठी बांधते, त्यावेळी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि भावा-बहिणीचं नातं अधिक अतूट आणि विश्वासाने भरलेलं असावं अशी इच्छा व्यक्त करते. त्यामुळे भावाला राखी बांधताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

राखी बांधण्याचा मुहूर्त -raksha bandhan 2025 muhurat

९ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा मुहूर्त सकाळी ५ वाजून ४७मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १ वाजून २४ मिनिटात संपेल. म्हणजे राखी बांधण्यासाठी ७ तास ३७ मिनिटांचा वेळ मिळेल.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)