आपल्या भारतात ज्योतिषशास्त्राला (Rashi Bhavishya)खूप महत्त्व आहे . आपल्या राशीनुसार आपलं भविष्य काय असेल याची प्रत्येकाला उत्सुकता असते. ग्रहांच्या चालीनुसार राशीत बदल होतात. आणि या बदलाचा परिणाम लोकांच्या जीवनावर होतो असे मानले जाते. यंदाच्या दसऱ्यानंतर अनेक राशींच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २ ऑक्टोबर रोजी पहाटे २:२७ वाजता बुध आणि गुरु एकमेकांपासून ९० अंशांवर स्थित असतील, यामुळे ‘केंद्र दृष्टी योग’ तयार होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे मेष, कर्क आणि धनु राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे.
मेष राशी Rashi Bhavishya
या राशीत जन्मलेल्यांसाठी गुरु-बुध केंद्र योग अत्यंत शुभ ठरू शकतो. या काळात बुध तिसऱ्या घरात असेल, यामुळे मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. जर कोर्टात तुमची काही कामे रखडले असतील तर ती दसऱ्यानंतर निकाली लागतील. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या शत्रूंवर तुम्ही मात कराल. आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
कर्क राशी
कर्क राशीत जन्मलेल्यांसाठी गुरु-बुध केंद्र योग अनुकूल राहू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेली तुमची कामे दसऱ्या नंतर मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण अत्यंत सकारात्मक राहिले. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दसऱ्यानंतरचा काळ हा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची आणि पगार वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला मानसन्मान मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात आणि बाहेर कुठेतरी प्रवास करण्याचा योग जुळून येईल. Rashi Bhavishya
धनु राशी
या राशीत जन्मलेल्यांसाठी गुरु-बुध केंद्र योग सुखाचे दिवस आणणार आहे. जिथे जिथे तुम्ही लाथ माराल तिथे तिथे तुम्ही पाणी काढू शकता. गुंतवणुकीसाठी दसऱ्यानंतरचा काळ हा अतिशय अनुकूल राहील परंतु गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय फायदेशीर ठरू शकतो. तसेच व्यावसायिका नाही दसऱ्यानंतर नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. साहजिकच, धनु राशीची व्यक्ती मग ते नोकरदार असो किंवा व्यवसायिक असो उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतीलच आणि आर्थिक भरभराट सुद्धा दसऱ्यानंतरच होईल. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांचे लग्न दसऱ्यानंतर ठरू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






