Rashi Bhavishya : वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात, ज्याचा प्रभाव मानव जीवन आणि पृथ्वीवर दिसतो. कर्मफळ देणारा आणि न्यायाधीश मानला जाणारा शनी २० जानेवारीला आपलेच नक्षत्र उत्तराभाद्रपदात प्रवेश करेल. या नक्षत्राचा स्वामी शनी ग्रह स्वतः आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. चला तर जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
मकर राशी (Capricorn Horoscope)Rashi Bhavishya
मकर राशीच्या लोकांसाठी शनी देवांचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण शनी देव तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढत आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात नवी संधी मिळू शकते आणि आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. तुमच्या मनात आत्मविश्वास वाढेल आणि धाडसी घेण्याची क्षमता निर्माण होतील. भाऊ-बहिणींकडून सहकार्य मिळत आहे.
कर्क राशी (Cancer Horoscope)
शनी देवांचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. कारण शनी देव तुमच्या राशीपासून भाग्य स्थानात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात नशिबाची साथ मिळत आहे. मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल. तसेच या काळात तुम्ही धार्मिक किंवा मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि मान-प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. Rashi Bhavishya
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी देवांचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण शनी देव तुमच्या राशीपासून कर्म भावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. ज्यांना अजूनही नोकरी लागली नाही त्यांना नोकरी लागेल. ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांचे लग्न ठरेल. कुटुंबातील मालमत्तेतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबतचे संबंध चांगले राहतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






