ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हणतात… व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम शनी करतो असे म्हटले जाते…. शनी देवाची हालचाल कमी गतीने असली तरी त्याची हालचाल सर्वच राशींसाठी (Rashi Bhavishya) महत्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की जर शनिदेव प्रसन्न झाले तर ते एखाद्या व्यक्तीला गरीबापासून श्रीमंत बनवतात तर श्रीमंतला भिकारी बनवण्यात पण वेळ लागत नाही…. या वर्षी दिवाळीपूर्वी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शनी त्याची चाल बदलणार आहे. शनीच्या या संक्रमणाचा विशेष फायदा वृषभ मिथुन आणि मकर राशीच्या लोकांना होणार आहे. या लोकांच्या आयुष्यात आर्थिक भरभराटीस सुखाचे दिवस येऊ शकतात.
1) वृषभ – Rashi Bhavishya
शनीच्या चालीतील बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल दिसून येतील. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमची कोणती जुनी कामे रखडले असतील तर तीन ऑक्टोंबर नंतर ती पूर्णत्वास जातील. कुटुंबांमध्ये सकारात्मक वातावरण राहील. तुम्ही जर कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल. 3 ऑक्टोंबर नंतर अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
2) मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची चाल शुभफळ घेऊन येईल. नशिबाची साथ तुम्हाला लाभेल… आणि कठीण परिस्थितीतही तुम्हाला यश मिळेल. शिक्षण आणि करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक फायदा होईल. बेरोजगारांना तरुणांना ३ ऑक्टोबर नंतर नोकरीची संधी आहे. मित्रांसोबत प्रवास करण्याचा योग जुळून येईल. Rashi Bhavishya
3) मकर
शनिदेव मकर राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे. जर तुम्ही अनेक दिवसापासून कोणत्या अडचणी आणि संकटात असाल तर ती संकटे दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. साहजिकच आर्थिक भरभराट होईल…. तुम्ही जर व्यवसायिक असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. एकूणच काय तर हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून खूप शुभ ठरेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






