वैदिक कॅलेंडरनुसार, ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात आणि शुभ-अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. १८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०१ वाजता, सिंह राशीत शुक्र आणि मीन राशीत शनि १५० अंशांच्या कोनात येऊन षडाष्टक योग तयार करतील. या षडाष्टक 3 राशींच्या लोकांचा वाईट काळ सुरू होणार आहे. या राशीच्या लोकांना (Rashi Bhavishya) मोठ्या अडचणी आणि संकटांना सामोरे जावं लागू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया…..
1) मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे १८ सप्टेंबर पासून या राशीच्या लोकांना अनावश्यक खर्चाला सामोरे जावं लागू शकते. साहजिकच तुमचं या महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा… कोर्ट कचेऱ्या मागे लागू शकतात…. कारण तुमच्यावर कोणताही खोटा आरोप दाखल होण्याची शक्यता आहे….. त्यामुळे कोणतीही कामे करताना अतिशय सावधगिरी बाळगा. या काळात शनि आणि मंगळाच्या मंत्रांचा जप करावा.
2) धनु राशी – Rashi Bhavishya
षडाष्टक योगाची निर्मिती धनू राशीच्या लोकांना सगळा खेळ बिघडवून टाकणारा ठरेल. कारण धनु राशीसाठी शुक्र नवव्या घरात असेल आणि शनि चौथ्या स्थानात असेल. यामुळे १८ सप्टेंबर पासून कुटुंब आणि घरगुती इतर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्ही व्यावसायिक असाल तर आर्थिक कामे थांबू शकतात. नको त्या मार्गाला विनाकारण पैसेही खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना जपून आणि विचारपूर्वक करा. Rashi Bhavishya
3) सिंह राशी
षडाष्टक योग सिंह राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकतो. कारण सिंह राशीत, शुक्र पहिल्या घरात असेल, ज्यामुळे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास प्रभावित होतो, तर शनि आठव्या घरात असेल. त्यामुळं १८ सप्टेंबर नंतर तुम्हाला आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर जोडीदारासोबत चे संबंध बिघडवू शकतात. कोणताही व्यवसाय करत असताना पार्टनर शिप मध्ये करू नका अन्यथा आर्थिक नुकसान झालेच म्हणून समजा…
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






