Which zodiac signs are beneficial in September: वास्तुशास्त्र आणि रत्नशास्त्राप्रमाणेच ज्योतिषशास्त्र एक महत्वाचे शास्त्र आहे. यामध्ये राशीनुसार सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव ठरवले जातात. राशींचा संबंध थेट ग्रहांशी जोडलेला आहे. ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत आपली स्थिती बदलत असतात. ग्रहांच्या या नक्षत्र बदलाचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव राशींवर दिसून होतो.
ग्रहांच्या नक्षत्र बदलाचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव बाराही राशींवर दिसून येतो. १५ सप्टेंबरला बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रह येत्या २ ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीतच विराजमान असणार आहे. बुध ग्रह बुद्धी आणि व्यापारासाठी प्रभावी मानले जातात. त्यामुळे बुध गोचरने काही राशींचे भाग्य उजळणार आहे. या १५ दिवसांत काही राशींना सकारत्मक बदल दिसून येणार आहे. पाहूया या राशी नेमक्या कोणत्या आहेत….
कन्या-
बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांसाठी सुवर्णयोग आहे. याकाळात तुमच्या नोकरी-व्यवस्यात विशेष प्रगती दिसून येईल. बुध गोचरदरम्यान तुमच्या व्यक्तिमत्वात, बुद्धिमत्तेत आश्चर्यकारक बदल दिसून येईल. चारचौघांत तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. तसेच यादरम्यान काही लोकांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही लोकांना नोकरीमध्ये बढतीसुद्धा मिळू शकते. याकाळात तुम्ही महत्वाचे निर्णय घेतल्यास ते फायदेशीर ठरतील.
मिथुन-
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाने मिथुन राशीच्या चतुर्थ घरात प्रवेश केला आहे. बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी ग्रहसुद्धा आहे. त्यामुळेच बुध गोचरने मिथुन राशीच्या लोकांनासुद्धा विशेष फायदा मिळणार आहे. यादरम्यान नोकरीमध्ये बॉससोबत तुमचे नाते सुधारतील आणि आणखीन मजबूत होतील. तसेच घरात, नात्यांमध्ये आणि मनामध्ये शांती आणि समाधान वृत्ती निर्माण होईल. याकाळात तुमचा पगार वाढण्याचीसुद्धा शक्यता आहे.
धनु-
धनु राशीच्या दहाव्या घरात बुध ग्रहाने गोचर केले आहे. या ग्रहाच्या गोचरने धनु राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. ऑफिसमध्ये नवीन ओळख मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी आणि नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. कमाईचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्यामध्ये कलात्मक वृत्ती निर्माण होईल त्याचा तुमच्या करिअरसाठी विशेष फायदा होईल. धनु राशीच्या लोकांसाठी हा सुवर्णयोग आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






