जेवण करताना तुम्ही देखील चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने बसता का? शास्त्रानुसार ‘ही’ योग्य पद्धत!

Written by:Rohit Shinde
Published:
घरामध्ये आपण बऱ्याचदा कुटुंबासोबत जेवण करतो, यामध्ये देखील वास्तुशास्त्रानुसार काही नियम आहेत. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ....
जेवण करताना तुम्ही देखील चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने बसता का? शास्त्रानुसार ‘ही’ योग्य पद्धत!

बऱ्याचदा आपण कुटुंबासमवेत एकत्रित घरात जेवण करत असतो. परंतु घरात पंगतीने अथवा एकटे जेवायला बसण्याचे देखील काही वास्तुशास्त्रीय नियम आहेत. अनेक जण जेवताना काही छोट्या -छोट्या चुका करतात, वास्तुशास्त्रानुसार त्याचा मोठा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर पडू शकतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही जागा असतात, त्या ठिकाणी बसून जेवण केल्यास घरात गरिबी येते. अचानक धनहानी होते. आरोग्याच्या देखील समस्या निर्माण होतात.  त्यामुळे नेमकी योग्य पद्धत आणि ठिकाण कोणते, त्याबद्दल जाणून घेऊ…

घरामध्ये जेवण करताना ‘हे’ टाळा!

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाजाजवळ चुकूनही जेवण करू नये, किंवा एखादी वस्तू खाऊ नये. तसे केल्यास तुमच्या घरात नाकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा घरात सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचं सर्वात मोठं स्थान असतं. असं म्हणतात याच दरवाजातून देव देखील तुमच्या घरात प्रवेश करत असतात. त्यामुळे दरवाजा जवळ बसून जेवण केल्यास तो सकारात्मक ऊर्जेच्या मार्गातील अडथळा मानला जातो.

पवित्र जागी जेवण करणं हे शुभ मानलं जातं, परंतु कधीही देवघराजवळ बसून जेवणाची चूक करू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. देवी देवता नाराज होतात, असं मानलं जातं. देवघराच्या जवळ बसून जेवल्यास तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

पलंगावर बसून देखील जेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही पलंगावर बसून जेवत असाल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. घरात नकारात्म ऊर्जा निर्माण होते, अशी ऊर्जा ही तुमच्या प्रगतीमधील अडथळा ठरते.

घरात जेवण करण्याची योग्य पद्धत

वास्तुशास्त्रानुसार जेवण हे नेहमी स्वयंपाक घरातच करावं, जेवण करण्यापूर्वी तुमच्या आराध्य देवाचं नामस्मरण करा, त्यामुळे जेवताना सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, तुमच्या आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतील, तसेच तुमच्या दैनंदिन जीवनात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील असं वास्तूशास्त्र सांगतं. त्यामुळे तुम्ही देखील वरील काही चुका टाळून योग्य नियम पाळू शकता, दक्षिण अथवा पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करणे शक्यतो टाळावे. पूर्व अथवा उत्तर या दिशा शुभ मानल्या जातात.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews