Marathi News

Nag Panchami Special Recipe : नागपंचमीच्या सणाला बनवा पुरणाच्या दिंडांची पारंपरिक रेसिपी

Published:
श्रवणातील पहिला सण नागपंचमी, त्यादिवशी संपूर्ण पुरणाचा स्वयंपाक असतो पण नागपंचमीला तवा चुलीवर चढवला जात नाही त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रियन घरात या दिवशी पुरणाचे दिंडे बनवले जातात.
Nag Panchami Special Recipe : नागपंचमीच्या सणाला बनवा पुरणाच्या दिंडांची पारंपरिक रेसिपी

पुरणाचे दिंड” ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, जी नागपंचमीला विशेषतः बनवतात. हे दिंड चणा डाळ आणि गुळाच्या मिश्रणातून बनवतात आणि ते वाफवून किंवा शिजवून घेतले जातात. नागपंचमीच्या सणाला ह्या नैवेद्याला खूप महत्व आहे. पुरणाचे दिंड कसे बनवतात जाणून घेऊयात…

पुरणाचे दिंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पुरणासाठी
    • एक वाटी हरभरा डाळ
    • अर्धी वाटी गूळ
    • वेलची पूड
    • जायफळ पूड
    • ½ चमचा जायफळ
  • कणीक मळण्यासाठी
    • दीड वाटी गव्हाचे पीठ
    • ¼ चमचा मीठ
    • पाणी 

पुरण कसे बनवायचे

  • हरभरा डाळ उकडून घ्या.
  • नंतर ती डाळ गुळासोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • कढईत तूप गरम करून त्यात हे मिश्रण परतून घ्या.
  • गूळ वितळल्यावर त्यात डाळ, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून त्याला थंड होऊ द्या.

दिंड कसे बनवायचे

  • गव्हाचे पीठ मळून घ्या.
  • त्या पिठाचे छोटे गोळे करून, त्याची पारी लाटून घ्या.
  • पारीमध्ये पुरण भरून, दिंडाचा आकार द्या.
  • हे दिंड वाफेवर शिजवून घ्या. 
पुरणाचे दिंड कसे सर्व्ह करावे
  • गरमागरम दिंड तुपासोबत खायला खूप छान लागतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews