Marathi News

Putrada Ekadashi : यंदा कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, आणि महत्त्व

Published:
पुत्रदा एकादशीचे व्रत खूप खास मानले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे. हे व्रत ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही असे लोक खास करुन करतात. यंदा कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या
Putrada Ekadashi : यंदा कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, आणि महत्त्व

श्रावणाची सुरुवात झाली असून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पुत्रदा एकादशी आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ही एकादशी साजरी करतात. याला पवित्रा एकादशी असेही म्हणतात. पुत्रदा एकादशीचे व्रत खास करून मुलांसाठी केले जाते. ज्या जोडप्यांना मूल हवे आहे, किंवा संतती मध्ये अडचणी येतात ते लोक हे व्रत करतात. चला तर मग पुत्रदा एकादशी कधी आहे आणि तिचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया…

पुत्रदा एकादशीचे महत्त्व

पुत्रदा एकादशी, जी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ला येते, यावर्षी ४ ऑगस्ट, २०२५ रोजी आहे. या दिवसाला पवित्रा एकादशी असेही म्हणतात. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतती प्राप्ती होते आणि मुला-बाळांना सुख-समृद्धी लाभते, अशी मान्यता आहे. या व्रताचे मुख्य महत्त्व म्हणजे ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे, त्यांना पुत्रप्राप्ती होते. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुला-बाळांना सुख-समृद्धी लाभते आणि त्यांचे कल्याण होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची विशेष कृपा प्राप्त होते.

पुत्रदा एकादशी कधी आहे? 

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी सोमवार, 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 41 मिनिटांनी सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 12 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार, पुत्रदा एकादशीचे व्रत मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी पाळले जाईल.

पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे?

  • एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला सूर्यास्तापूर्वी भोजन करावे.
  • एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी.
  • घरात विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याची विधिवत पूजा करावी.
  • “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करत व्रत करण्याचा संकल्प घ्यावा.
  • फक्त फलाहार किंवा दुधाचे सेवन करावे.
  • या दिवशी अन्न, पाणी आणि इतर पदार्थांचे सेवन टाळावे.
  • दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर उपवास सोडावा. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews