Marathi News

Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, श्रावणात बनवा उपवासाचा कुरकुरीत मेदू वडा

Published:
तुम्ही देखील उपवासाचे मेदू वडे ट्राय करु शकता. घरच्या घरी हे मेदू वडे कसे बनवता येतात जाणून घेऊ….
Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, श्रावणात बनवा उपवासाचा कुरकुरीत मेदू वडा

सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. अशात साबुदाणा खिचडी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाला वेगळं काही करू शकता. उपवासाच्या दिवशी आहारात समावेश करण्यासाठी एक टेस्टी पदार्थ आम्ही घेऊन आलो आहोत उपवासाचा मेदू वडा. चला तर मग पाहुयात उपवासाच्या मेदू वड्याची सोपी मराठी रेसिपी….

साहित्य

  • १ वाटी भगर (भगर भिजवून घ्या)
  • २ उकडलेले बटाटे
  • १ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • १/२ चमचा जिरे
  • मीठ (चवीनुसार)
  • तेल (वडे तळण्यासाठी)
  • शेंगदाणा कूट
  • ओले खोबरे

कृती

  • भगर रात्रभर किंवा कमीत कमी २-३ तास भिजत ठेवा.
  • भगर आणि बटाटे मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • वाटलेल्या मिश्रणात जिरे, मिरची, मीठ आणि शेंगदाणा कूट (आवश्यक असल्यास) टाका.
  • मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
  • कढईत तेल गरम करा.
  • मध्यम आचेवर वडे तळून घ्या.
  • वडे सोनेरी झाल्यावर टिश्यू पेपरवर काढा.
  • गरमागरम वडे दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत सर्व्ह करा. 

उपवासाच्या चटणीसाठी साहित्य

  • १/२ वाटी शेंगदाणे, २-३ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा जिरे, चवीनुसार मीठ.

उपवासाच्या चटणीसाठी कृती

  • शेंगदाणे, मिरची, जिरे आणि मीठ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • चटणी तयार आहे. 

टीप

  • वडे तळताना तेल जास्त गरम नसावे, मध्यम आचेवर तळा.
  • तुम्ही वड्यांमध्ये ओले खोबरे देखील घालू शकता.
  • उपवासाच्या चटणीसाठी शेंगदाणे, मिरची, जिरे आणि मीठ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • उपवासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरू शकता. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews