Shravan Somwar Recipes: श्रावण महिन्यात दररोज किंवा उपवासाला सतत बटाटयाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर आता कच्च्या केळीची भाजी ट्राय करा. ही भाजी चवीला तर उत्तम असतेच शिवाय पौष्टिकही असते. चला पाहूया रेसिपी…
कच्च्या केळ्याची भाजी बणवण्यासाठी साहित्य-
५०० ग्रॅम कच्ची केळी
४ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून जिरे
३ हिरव्या मिरच्या
१० कढीपत्ता
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून साखर
कच्च्या केळ्याची भाजी बणवण्याची रेसिपी-
कच्चे केळे त्याच्या सालीसह कापून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये पाणी घाला आणि वरच्या भांड्यात केळी ठेवा आणि उकळा.
आता कच्च्या केळीची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा.
आता कच्च्या केळीची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा.
आता कढईत तेल गरम झाल्यावर जिरे तडतडू द्या, नंतर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला आणि चिरलेली कच्ची केळी घाला. चवीनुसार मीठ, मिरची, साखर घाला आणि चांगले मिसळा.
आता सर्वकाही चांगले मिसळल्यावर गॅस बंद करा आणि सर्व्ह करा.
कच्च्या केळ्याची शाकाहारी डिश तयार आहे.






