माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी काय करावे? आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

Written by:Rohit Shinde
Published:
माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतीक सुखांची कमतरता भासत नाही.
माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी काय करावे? आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतीक सुखांची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मीची प्रसन्नता ही जीवनातील समृद्धी, आनंद आणि शांतीचे मूळ मानली जाते. लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सत्यनिष्ठ आचरण, परिश्रम, संयम आणि सतत सकारात्मक विचार महत्वाचे असतात. घरात स्वच्छता, सात्विकता आणि नित्य पूजा केल्याने लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते.

लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी घरात स्थायिक होऊन आर्थिक स्थैर्य प्रदान करतात. दानधर्म, प्रामाणिक व्यवहार आणि कुटुंबात सौहार्द राखल्याने लक्ष्मीची कृपा टिकते. लक्ष्मीची प्रसन्नता मिळाल्यास जीवनात धनधान्य, सुखसमृद्धी आणि स्थिरता येते. श्रद्धा आणि भक्तीने लक्ष्मीचे पूजन केल्यास सदैव आर्थिक प्रगती साध्य होते. त्यासाठीचे काही प्रभावी उपाय जाणून घेऊयात…

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय

शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख, गाई, कमळाचे फूल, माखणा, बताशे, खीर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी. यासोबतच श्री सूक्ताचे पठण करावे. असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल.

कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणूनच शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे. कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मीचा फोटो किंवा मुर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी. तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मुर्ती किंवा फोटो नसावे.

वैवाहिक जीवनात काही वाद होत असतील तर शुक्रवारी बेडरूममध्ये लव्ह बर्ड्सचे चित्र लावावे. असे काही उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

माता लक्ष्मी धनाची देवता म्हणून पूजनीय

धन लक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतीक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायांचा अवलंब करतो.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews