Marathi News

सोमवारी हा सोपा उपाय करून पहा, भगवान शिव तुमचे सर्व दुःख आणि त्रास दूर करतील!

Last Updated:
सोमवार हा देवांचा देव महादेवाला समर्पित आहे. भगवान शिव आपल्या भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात. सोमवारी काही सोपे उपाय करून भगवान शिव यांना प्रसन्न करू शकता
सोमवारी हा सोपा उपाय करून पहा, भगवान शिव तुमचे सर्व दुःख आणि त्रास दूर करतील!

हिंदू धर्मात, सोमवार विशेषतः भगवान शिव यांना समर्पित आहे, भगवान शिव त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. लोक सोमवारी उपवास करतात आणि विधीनुसार शिवलिंगाची पूजा करून आपली श्रद्धा व्यक्त करतात. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज नाही. परंतु त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि जीवनात आनंद आणि शांती राखण्यासाठी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. सोमवारी, भगवान शिव यांच्या पूजेसाठी विशेष उपाय केल्यास, तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि दुःख दूर होऊ शकतात. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे, आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात.

शिव मंदिरात जाणे

सोमवारी, म्हणजे सोमवारच्या दिवशी भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक, वैवाहिक आणि इतर समस्या दूर होतात.

सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे आणि नंतर मंदिरात जावे किंवा घरी शिव चालीसा किंवा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. ज्यामुळे शिव प्रसन्न होतात. सोमवारच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते. 

शिवलिंगला जल, दूध आणि गंगाजल अर्पण करा

सोमवारी भगवान शिव यांना दुधाने अभिषेक करणे खूप फायदेशीर मानले जाते. सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यावर दूध आणि जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. सोमवारी शिवलिंगावर जल, दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.

बेलपत्र आणि धतूरा अर्पण करा

सोमवारी बेलपत्र अर्पण करणे एक धार्मिक उपाय आहे. अनेकजण सोमवारी शिव मंदिराला भेट देऊन शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतात. यामुळे शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी येते. भगवान शिवाला बेलपत्र आणि धतूरा अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे जीवन सुख-सौभाग्य आणि समृद्धीने भरले जाते. बेलपत्र अर्पण केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात.

सोमवारी भगवान शिवाची पूजा आणि उपवास केल्याने, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनातील दुःख दूर होतील.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews