Gemstones to overcome problems in married life: ज्योतिष शास्त्राप्रमाणेच रत्न शास्त्रालाही विशेष महत्व आहे. रत्न शास्त्रात रत्नाला महत्व असते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धी आणण्यासाठी रत्नांचा वापर केला जातो. रत्न शास्त्राप्रमाणे रत्न धारण केल्याने आर्थिक, वैवाहिक, करिअर, व्यवसाय अशा अनेक बाबींमधील अडचणी दूर होतात. प्रत्येक अडचणीनुसार वेगवगळे रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने रत्न धारण करणे फायदेशीर असते.
अनेकांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात. पती-पत्नीमध्ये सतत राग, वाद आणि भांडणे होत असतात. त्यामुळे घरातील वातावरण खराब होऊ लागते. शिवाय याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. परंतु रत्न शास्त्रात वैवाहिक आयुष्यात आनंद आणि सुखसमृद्धी येण्यासाठी काही रत्न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे रत्न नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया…
डायमंड-
वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि रोमांच हवा असेल तर डायमंड फायदेशीर आहे. हे रत्न धारण केल्याने नात्यातील रोमान्स वाढतो. पती-पतींमधील गैरसमज दूर होतात. वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि विश्वास वाढतो. त्यामुळे वैवाहिक आयुष्यात डायमंड धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
पर्ल-
पर्ल धारण केल्याने वैवाहिक आयुष्य चांगले होते. यामुळे पती-पत्नीमधील भावनिक नाते सुधारते. एकमेकांवर विश्वास अधिक घट्ट होतो. नात्यामधील प्रेम आणि विश्वास वाढतो. त्यामुळे पतिपत्नीमधील गैरसमज आपोआप दूर होतात.
रोज क्वार्टज-
रोज क्वार्टजचे दागिने परिधान केल्याने वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतात. हे रत्न वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढवण्यात मदत करते. प्रेम वाढल्याने आपापसांत सामंजस्य वाढते. आणि वादविवाद-भांडणे दूर होतात. वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे रत्न धारण करता येते.
एमराल्ड-
एमराल्ड हे रत्न वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी आणण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे रत्न धारण केल्याने पती-पत्नीमधील विश्वास आणि प्रेम वाढते. त्यामुळे वादविवाद, गैरसमज दूर होतात. शिवाय नातेसंबंध अधिक मजबूत होतात. हे रत्न धारण केल्याने काही दिवसांतच सकारत्मक परिणाम दिसून येतात.
नीलम-
नीलम रत्न धारण केल्याने वैवाहिक आयुष्य सुखी होते. या रत्नामुळे वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतात. नात्यातील विश्वास वाढते. पती पत्नीच्या नात्यामध्ये सामंजस्य आणि विश्वास निर्माण होते. प्रत्येक कार्यात एकमेकांचे सहकार्य लाभते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






