सैंधव मिठाच्या ‘या’ उपायाने अनेक समस्या होतात दूर, जाणून घ्या

Published:
वास्तूशास्त्रात, नकारात्मक उर्जेशी लढण्यासाठी मीठ हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. मिठाच्या द्रावणामुळे आजूबाजूला पसरलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
सैंधव मिठाच्या ‘या’ उपायाने अनेक समस्या होतात दूर, जाणून घ्या

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घर आणि कुटुंबाबाबत अनेक नियम दिले आहेत. घराच्या बांधकामापासून ते घरात कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात, या सर्व गोष्टींचे वास्तुशास्त्रात वर्णन केले आहे. जर आपण जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे काही चुका केल्या तर तो वास्तु दोष बनतो आणि आपल्याला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का की सैंधव मीठ वापरून काही उपाय करून तुम्ही वास्तुदोषांपासून मुक्तता मिळवू शकता.

सैंधव मीठाने घरातील नकारात्मकता दूर करा

वैवाहिक जीवनासाठी

सैंधव मीठ घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि वैवाहिक जीवन आनंदी होते. जर पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील किंवा नात्यात प्रेमाची कमतरता असेल तर बाथरूममध्ये किंवा घराच्या कोपऱ्यात एका भांड्यात सैंधव मीठ ठेवावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. 

मानसिक शांतीसाठी

जर तुम्ही मानसिक ताणतणावाने ग्रस्त असाल, किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण घेऊ लागलात. अशा परिस्थितीत, सैंधव मीठाचा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो, आठवड्यातून एकदा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे सैंधव मीठ घाला. आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ मिसळून आंघोळ केल्याने मानसिक तणावही दूर होतो, त्यामुळे वैवाहिक जीवन सुखकर होते.

नजर दोष टाळण्यासाठी उपाय

घरात किंवा व्यक्तीवर वाईट नजर पडल्यास, सैंधव मीठ वापरून नकारात्मक ऊर्जा दूर करता येते. कुटुंबातील सदस्यांवर वाईट नजर पडल्यास, त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा मीठ टाकून, ते मीठ पाण्यात टाकावे. मुलांचे वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या खोलीत खडी मीठ ठेवा.

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी

जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे, तर दररोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर खडे मिठाचे पाणी शिंपडा, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन प्राप्त होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews