सूर्य आणि बुध संक्रमण ‘या’ राशींसाठी ठरणार लाभदायक, मिळेल पैसा, चमकेल नशीब

Published:
ग्रहांची बदलेली स्थिती काही राशींना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या राशींना सर्व बाबींमध्ये फायदाच-फायदा मिळणार आहे.
सूर्य आणि बुध संक्रमण ‘या’ राशींसाठी ठरणार लाभदायक, मिळेल पैसा, चमकेल नशीब

How will the month of September be according to the zodiac sign:   ज्योतिषशास्त्राचा संबंध थेट खगोलशास्त्राशी जोडला गेला आहे. त्यानुसार ग्रहांचे स्थान बदलेले कि राशीवरसुद्धा प्रभाव पडतो. यामध्ये ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपले स्थान आणि दिशा बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक राशीवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येतो. ग्रहांची बदलेली स्थिती काही राशींसाठी अतिशय चांगली असते. त्यांना प्रत्येक क्षेत्रात फायदाच-फायदा मिळतो.

सध्या सुरु असलेल्या सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह आणि सूर्य असे दोन मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहेत. त्यांच्या स्थिती बदलाने अनेक सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येणार. या ग्रहांची बदलेली स्थिती काही राशींना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या राशींना सर्व बाबींमध्ये फायदाच-फायदा मिळणार आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया….

 

मेष-

बुध आणि सूर्य गोचर मेष राशीसाठी अत्यंत चांगला असणार आहे.या ग्रहांच्या स्थिती बदलाने मेष राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान मिळेल. मोठ्या प्रमाणात तुमची प्रतिमा सुधारेल. उद्योग-व्यवसायात आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल. घरात सुखसमृद्धी येईल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील.

 

सिंह-

बुध आणि सूर्य गोचर सिंह राशीसाठीसुद्धा लाभदायक असणार आहे. यामुळे जुनाट आजार दूर होऊन तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायात नफा होईल आणि एखादी चांगली संधी चालून येईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना इंटरव्ह्यूसाठी कॉल येऊ शकतो. पैसा कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील.

 

कर्क-

बुध आणि सूर्य गोचर कर्क राशीसाठी अतिशय फायदेशीर असणार आहे. याकाळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांची आवक वाढेल. मिळकतीचे नवे मार्ग खुले होतील. उद्योग-व्यापारात नवनव्या संधी प्राप्त होतील. तसेच कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews