Marathi News

Vastu Tips : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका तिजोरी; अन्यथा लवकरच कंगाल व्हाल

Published:
जर तुमच्या खिशात पैसा टिकत नसेल, आणि महिन्याच्या अखेर तुमचा खिसा जर मोकळाच राहत असेल तर नक्कीच यामागे तुमच्या घरातील वास्तुदोष असू शकतो
Vastu Tips : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका तिजोरी; अन्यथा लवकरच कंगाल व्हाल

आपल्या भारतात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) विशेष महत्त्व दिले जाते…. आपल्या घरात पैशाची कमतरता भासू नये, आपले आयुष्य सुख समृद्धीने भरलेले असावे, आपल्याला उत्तम आरोग्य लाभ घ्यावे यासाठी घरातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवण्याकडे आपला कल असतो…. याशिवाय वास्तुशास्त्रामुळे घरातील लोकांमध्ये सुसंवाद निर्माण होतो, तसेच शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याण साधले जाते. आज काल तर वास्तुशास्त्राचा प्रभाव इतका वाढला आहे की, वास्तुशास्त्रानुसारच घर बांधण्याचा कल खूपच वाढलेला आहे. कारण  वास्तुशास्त्रात दोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. …

उदाहरणार्थ, जर तुमच्या खिशात पैसा टिकत नसेल, तुम्ही किती पैसे कमावले तरी त्याचा उपयोग चुकीच्या कामासाठी होत असेल आणि महिन्याच्या अखेर तुमचा खिसा जर मोकळाच राहत असेल तर नक्कीच यामागे तुमच्या घरातील वास्तुदोष असू शकतो…. यातीलच एक महत्वाचं कारण म्हणजे घरातील तिजोरीची दिशा…. तुम्ही तिजोरी ज्या ठिकाणी ठेवता त्याचा थेट तुमच्या आर्थिक नशिबावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, घरात तिजोरी कोणत्या दिशेने ठेवू नये आणि पैसे ठेवण्यासाठी कोणती जागा सर्वात शुभ मानली जाते आणि कोणती अशुभ ते आज आपण जाणून घेऊया…

तिजोरी ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा कोणती ? Vastu Tips

वास्तुशास्त्रानुसार, घरात तिजोरी ठेवण्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे उत्तर उत्तर दिशा…. उत्तर दिशा म्हणजे साक्षात कुबेराची दिशा…. कुबेर हे उत्तर दिशेने वास करतात असे मानले जाते… त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपली धन, पैसा ठेवण्याची तिजोरी वा कपाट हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे, उत्तर दिशेलास तुमच्या घरातील कपाट उघडले जावे…. घराची तिजोरी उत्तरेला असेल तर कधीही तुम्हाला पैशाची कमी पडत नाही….. यावरच पैसा स्वतःच तुमच्याकडे आकर्षित होतो असे म्हटले जाते… घरात पैशाचा प्रभाव तर वाढतोच याशिवाय तुम्ही जो पैसा कमावलाय तो सुद्धा सुरक्षित राहतो. Vastu Tips

पूर्व दिशाही फायदेशीर

वास्तुशास्त्रानुसार, उत्तरेव्यतिरिक्त, पूर्व दिशा देखील तिजोरी किंवा पर्स ठेवण्यासाठी शुभ मानली जाते. पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे, जी प्रगती आणि सन्मानाचे प्रतीक आहे. अशावेळी घराची तिजोरी पूर्व दिशेने ठेवल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते, आर्थिक ताकद वाढते…. पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग तयार होतात…. ज्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची चिंता करण्याची गरज भासत नाही….

कोणती दिशा आहे अशुभ??

पश्चिम दिशा – वास्तुशास्त्रानुसार, पश्चिम दिशेने तिजोरी ठेवणे अशुभ मानले जाते. घराची तिजोरी पश्चिमेला असेल तर तुम्हाला सततच्या खर्चाला सामोरे जाऊ शकते तुम्ही किती पैसा कमावला तरी महिन्याच्या अखेर तुमचा खिसा हा रिकामाच राहण्याची शक्यता असते. .. पश्चिम दिशेष शिवाय नैऋत्य दिशेला ही तिजोरी ठेवणे म्हणजे संकटांना आमंत्रण देण्यासारखंच असते . नैऋत्येला तिजोरी ठेवल्याने घरात कलह वाढतो…. तसेच नको त्या मार्गाने खर्च होतो…

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews