Vastu Tips : घराच्या उत्तरेला ठेवा या 4 वस्तू; घरात येईल पैशाचा महापूर

Published:
उत्तर दिशा म्हणजे साक्षात कुबेराची दिशा.... कुबेर हे उत्तर दिशेने वास करतात असे मानले जाते... म्हणूनच श्रीमंत आणि यशस्वी लोक त्यांच्या घराच्या उत्तर दिशेला विशेष महत्त्व देतात.
Vastu Tips : घराच्या उत्तरेला ठेवा या 4 वस्तू; घरात येईल पैशाचा महापूर

आपल्या भारतात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) मोठं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना ठेवण्याचा प्रत्येकाचा कल असतो. कोणत्या दिशेला काय ठेवावे याचे बारकाईने निरीक्षण करून, माहिती घेऊनच त्यानुसार तेथे ती ती वस्तू ठेवली जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या वास्तु टिप्स देणार आहोत, ज्याचे पालन केल्याने तुमच्या घराची आर्थिक भरभराट होईल… घरात पैशाचा अक्षरशा महापुर येईल…

मित्रानो, वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. उत्तर दिशा म्हणजे साक्षात कुबेराची दिशा…. कुबेर हे उत्तर दिशेने वास करतात असे मानले जाते… म्हणूनच श्रीमंत आणि यशस्वी लोक त्यांच्या घराच्या उत्तर दिशेला विशेष महत्त्व देतात. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तरेला  शुभ वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे घरात धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. घरात सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उत्तर दिशेला कोणत्या वस्तू ठेवाव्यात ते जाणून घेऊया.

1) कुबेराचा फोटो – Vastu Tips

वास्तुशास्त्रात, उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा मानली जाते. संपत्तीचा देव भगवान कुबेर हे या दिशेचे देवता आहेत. अशावेळी जर कुबेराची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवली तर घरात पैशाची कमतरता भासणार नाही.  कुबेराची मूर्ती ठेवल्याने व्यवसायात सुद्धा यश मिळते, अडकलेले पैसे परत मिळतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होत जातात.

2) श्रीयंत्र –

वास्तुशास्त्र (Vastu Tips) आणि ज्योतिषशास्त्रात श्रीयंत्र अत्यंत शक्तिशाली मानले जाते. हे श्रीयंत्र उत्तर दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, घरात आर्थिक स्थिरता येते आणि प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतात.

3) तूळशीचे रोप

हिंदू धर्मात, तुळशीला देवीचे रूप मानले जाते. तुळशी केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही घराचे वातावरण शुद्ध करते. घराच्या उत्तर दिशेने तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सुसंवाद वाढतो. वास्तुनुसार घराच्या उत्तर दिशेने तुळशी लावल्याने घरात देवी लक्ष्मीचे वास येतो. साहजिकच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.

4) कासव

कासवाला दीर्घायुष्य, स्थिरता आणि संयमाचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) ती एक शुभ वस्तू मानली जाते. घराच्या उत्तर दिशेने कासवाची मूर्ती ठेवल्याने स्थिरता आणि शांती राहते. तसेच आर्थिक परिस्थिती मजबूत होते. कासवामुळे घरात सुख समृद्धी नांदते..

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews