कर्जापासून होईल सुटका, मिळेल अफाट पैसा, फक्त घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा ‘या’ वस्तू

Published:
वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुखसमृद्धी आणि आर्थिक समृद्धी येण्यास मदत होते.
कर्जापासून होईल सुटका, मिळेल अफाट पैसा, फक्त घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा ‘या’ वस्तू

Vastu Tips to get rid of debt:   अनेकांच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतात. वास्तु शास्त्रानुसार सतत आर्थिक समस्या येणे हे घरातील मुख्य दरवाजामध्ये वास्तु दोष असण्याची शक्यता असते. घराच्या मुख्य दरवाजामधून घरात सकारात्मकता आणि सुखसमृद्धी प्रवेश करते. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही दोष असतील तर ते वास्तु शास्त्राच्या नियमानुसार दुरुस्त करून घेतले पाहिजेत.

वास्तु शास्त्रानुसार घरात प्रत्येक गोष्ट वास्तुच्या नियमानुसार करणे गरजेचे आहे. असे न केल्यास वास्तु दोष लागू शकतो. परंतु वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुखसमृद्धी आणि आर्थिक समृद्धी येण्यास मदत होते. वास्तु नियमानुसार प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक योग्य जागा असते. शिवाय घरातील काही ठिकाणी काही वस्तू आवर्जून ठेवण्याचं सल्ला दिला जातो. त्यामुळे घरात सकारात्मकता येते. आज आपण घराच्या मुख्य दरवाजाजवळ कोणत्या वस्तू ठेवल्यास घरात आर्थिक समृद्धी येते आणि कर्जापासून सुटका मिळते याबाबत जाणून घेऊया….

 

तांब्याचा सूर्य-

वास्तु शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ तांब्याचा सूर्य लावणे अत्यंत चांगले असते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरातील आर्थिक समस्या दूर होऊन सुखसमृद्धी येते.

 

श्रीगणेशाची मूर्ती-

गणपती बाप्पाला विघ्नहर्तादेखील म्हटले जाते. त्यामुळेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ गणपती बाप्पाची मूर्तिक किंवा प्रतिमा लावल्यास घरातील अडचणी दूर होतात. तसेच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होते.

 

शमीचे रोप-

धार्मिक मान्यतेनुसार शमीचे रोप नकारात्मक उर्जेला तुमच्या घरापासून दूर ठेवते. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाजवळ शमीचे रोप लावणे अत्यंत चांगले असते. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते.

 

स्वस्तिकचे चिन्ह-

मुख्य दरवाजाजवळ तुम्ही स्वस्तिकचे चिन्ह बनवू शकता. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील वाईट नजर दूर होण्यास मदत होते. तसेच घरातील लोक आपापल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू लागतात.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews