Which Gemstone to Wear for Career Growth: प्रत्येकालाच आपल्या नोकरीमध्ये करिअरमध्ये बढती हवी असते. परंतु अनेकांना आतोनात प्रयत्न करूनसुद्धा करिअरमध्ये यश मिळत नाही. अशावेळी लोक निराश होतात. त्यांना करिअरमध्ये प्रगतीसाठी काय करावे सुचत नाही. अशावेळी अनेकजण रत्नशास्त्राची मदत घेण्याचा सल्ला देतात. मान्यतेनुसार रत्नशास्त्रामुळे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
वास्तु शास्त्राप्रमाणेच रत्न शास्त्रसुद्धा एक प्राचीन शास्त्र आहे. रत्नशास्त्रालासुद्धा विशेष महत्व आहे. रत्न शास्त्रामध्ये आर्थिक, कौटुंबिक, वैवाहिक आणि करिअरबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज आपण करिअर ग्रोथसाठी कोणते रत्न धारण करावे याबाबत जाणून घेणार आहोत. चला पाहूया करिअरमध्ये प्रगती करायला मदत करणारे रत्न नेमके कोणते आहेत…..
माणिक-
रत्नशास्त्रामध्ये माणिक या रत्नाला विशेष महत्व आहे. माणिक हे रत्न सूर्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. हे रत्न धारण केल्यास करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येते. शिवाय तुमच्यात आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे करिअरमध्ये तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम बनता. विशेष म्हणजे हे रत्न व्यवसायिक आणि राजकारणी लोकांनासुद्धा अतिशय फायदेशीर आहे.
मूंगा-
रत्नशास्त्राप्रमाणे मूंगासुद्धा एक खास रत्न आहे. या रत्नाचा संबंध मंगळ ग्रहाशी असल्याचे सांगितले जाते. हे रत्न धारण केल्यास तुमच्यामध्ये धाडसी वृत्ती निर्माण होते. तसेच मंगळ ग्रहाचा प्रभाव कमी होतो. आणि नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात. त्यामुळे नोकरीमध्ये प्रगती दिसून येते. मूंगा रत्नामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन तुम्ही आणखी उठावदार बनता. त्यामुळे यशसुद्धा प्राप्त होते. तसेच मूंगा धारण केल्याने त्वचेची ऍलर्जीसुद्धा दूर होते.
पन्ना-
रत्न शास्त्रानुसार पन्ना या रत्नाचा संबंध बुध ग्रहाशी आहे. हे रत्न अभ्यासात परीक्षेदरम्यान एकाग्रता निर्माण करण्यास मदत करते. खासकरून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनी हे रत्न धारण करणे फायद्याचे असते. हे रत्न धारण केल्याने करिअरमध्ये चांगली ग्रोथ दिसून येते. पन्ना रत्न धारण केल्यास मानसिक शांती आणि समाधानसुद्धा प्राप्त होते. परंतु हे रत्न ज्योतिषांच्या सल्ल्याने आपल्या राशीनुसार धारण करणे योग्य असते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






