वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी काय करावे? ‘हे’ आहेत सोपे वास्तु उपाय

Published:
वास्तु नियम घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तसेच या वस्तू सुखसमृद्धी आणि धन आकर्षित करतात.
वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी काय करावे? ‘हे’ आहेत सोपे वास्तु उपाय

Vastu Shastra Tips In Marathi:   हिंदू धर्मात रत्न शास्त्राप्रमाणेच वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. वास्तु शास्त्रामध्ये दिशेला प्रचंड महत्व आहे. त्यानुसार योग्य दिशेला योग्य वस्तू ठेवल्यास घरामध्ये चांगला प्रभाव दिसून येतो. वास्तु शास्त्रामध्ये उत्तर दिशेला खूप महत्व आहे. उत्तर दिशा अत्यंत चांगली समजली जाते. मान्यतेनुसार उत्तर दिशेमध्ये देवी लक्ष्मी आणि धन देवता कुबेर यांचा वास असतो. त्यामुळे या दिशेने सुखसमृद्धी येते.

वास्तु उपाय-

वास्तु शास्त्रात घरामध्ये वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी आणि आर्थिक स्थैर्य येण्यासाठी उत्तर दिशेमध्ये काही वस्तू ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या वस्तू घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तसेच या वस्तू सुखसमृद्धी आणि धन आकर्षित करतात. त्यामुळे या वस्तू ठेवणे अत्यंत चांगले असते. आज आपण पाहूया उत्तर दिशेत कोणती वस्तू ठेवल्याने काय फायदे मिळतात….

 

तिजोरी-

वास्तु नियमानुसार घरातील तिजोरी नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेत म्हणजेच ईशान्य कोणात ठेवावी. शास्त्रानुसार उत्तर दिशा धनाची देवी लक्ष्मी आणि धन देवता कुबेर यांची दिशा समजली जाते. त्यामुळे या दिशेत तिजोरी ठेवल्यास नेहमीच धन आकर्षित होते. आणि तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येत नाही.

धबधबा किंवा नदीचा फोटो-
तुमच्या वैवाहिक जीवनात सतत वादविवाद किंवा भांडणे होत असतील, तर घरात उत्तर दिशेला नदी किंवा धबधब्याचा फोटो लावा. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते. आपापसांतील मतभेद दूर होतात.

फाउंटन-
वास्तु शास्त्रानुसार वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर, घरामध्ये उत्तर दिशेला फाउंटन अर्थातच पाण्याचा कारंजा ठेवणे अत्यंत चांगले असते. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. तसेच घरामध्ये चांगल्या गोष्टी दिसून येतात.

कुबेर यंत्र-
वास्तु शास्त्रानुसार उत्तर दिशेला विशेष महत्व आहे. उत्तर दिशेला धन देवता कुबेर यांची दिशा असल्याचे मानले जाते. त्यामुळे उत्तर दिशेला कुबेर यंत्र ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने धनसंपत्ती आकर्षित होण्यास मदत होते. उत्तर दिशेमध्ये कुबेर यंत्र ठेऊन दररोज त्याची पूजा-अभिषेक केल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनधान्य येते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews