Marathi News

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कधी आहे? जाणून घ्या तारीख

Last Updated:
कधी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी? जाणून घ्या...
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कधी आहे? जाणून घ्या तारीख

हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्त्व आहे. या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रय महाराज. दत्तात्रयांचे अनेक अवतार असून त्या पैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात. महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा- परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात.

कधी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी

पौराणिक मान्यतेनुसार, स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. यंदा २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे.

अक्कलकोट येथे वास्तव्य

स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले. त्यांनी 40 वर्षांचे कार्य केले, त्यापैकी 21 वर्षे अक्कलकोट येथे वास्तव्य केले, असे मानले जाते. जिथे त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्यासाठी एक आध्यात्मिक केंद्र स्थापित केले.  

 

समाधी

श्री स्वामी समर्थांनी ३० एप्रिल १८७८ रोजी अक्कलकोट येथे ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली असे मानले जाते. त्यानंतर त्यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा महाराज यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews