धक्कादायक! क्रिकेटच्या वादावरुन अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याकडून 10 वीच्या मुलाची हत्या

Written by:Astha Sutar
Published:
एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ मारहाणीच्या घटनेचं रुपांतर हत्यापर्यंत पोहोचलं. त्यामुळ सर्वंत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक! क्रिकेटच्या वादावरुन अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याकडून 10 वीच्या मुलाची हत्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरमधील सिताराम सारडा शाळेमध्ये क्रिकेटच्या वादावरुन विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटच्या वादावरुन आणि क्रिकेट खेळण्यावरुन अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याने 10 वीत शिकत असलेल्या मुलाची हत्या केली आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ माजली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपाचारापूर्वीच मृत्यू…

दरम्यान, अहिल्यानगरमधील सिताराम सारडा शाळेच्या आवारातच आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, जखमी अवस्थेतच या विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचाराला घेऊन जात असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान, एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ मारहाणीच्या घटनेचं रुपांतर हत्यापर्यंत पोहोचलं. त्यामुळ सर्वंत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिताराम सारडा नावाजलेली शाळा

दुसरीकडे या धक्कादायक घटनेनंतर शाळेची सुरक्षा आणि प्रशासनावर टीका केली जात आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांची किरकोळ भांडणे आणि त्याचे रुपांतर हत्येमध्ये झाले. दरम्यान, शहरातील सिताराम सारडा ही नावाजलेली शाळा आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी काही काळ याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. सध्या या घटनेची पोलीस चौकशी करताहेत. दोन्ही मुले अल्पवयीन आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews