Marathi News

Bhool Bhulaiyaa 4 मध्ये परत येणार हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका, अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन आमनेसामने

Last Updated:
भूल भुलैया 4’ या (Bhool Bhulaiyaa 4) नव्या भागात हॉरर आणि कॉमेडीचा दुहेरी तडका पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी हे अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनला एकाच पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहेत
Bhool Bhulaiyaa 4 मध्ये परत येणार हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका, अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन आमनेसामने

बॉलिवूडमधील लोकप्रिय ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiyaa 4) ही फ्रेंचायझी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आतापर्यंत या मालिकेतील तीनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनने ‘रूह बाबा’च्या भूमिकेत धमाल उडवली होती. आता या दोन्ही कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

हॉरर आणि कॉमेडीचा दुहेरी तडका – Bhool Bhulaiyaa 4

‘भूल भुलैया 4’ या (Bhool Bhulaiyaa 4) नव्या भागात हॉरर आणि कॉमेडीचा दुहेरी तडका पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी हे अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनला एकाच पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार त्यांच्या आयकॉनिक लूकमध्ये परततील, तर कार्तिक आर्यन या वेळेस थोड्या गडद आणि रहस्यमय अवतारात दिसतील. दोघांमधील हा सामना म्हणजे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांचा उत्साह दुप्पट झाला आहे. एका चाहत्याने लिहिले की, हे तर जबरदस्त होणार आहे, तर दुसऱ्याने म्हटले की जर अक्षय आणि कार्तिक एका चित्रपटात आले तर बॉक्स ऑफिसवर वादळ येणारच.

‘भूल भुलैया’च्या प्रवासाकडे पाहिल्यास, पहिला भाग 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2022 मध्ये ‘भूल भुलैया 2’ प्रदर्शित झाला, ज्यात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. या चित्रपटाने अक्षयच्या जागी कार्तिकला एक नवी ओळख दिली.

2024 मध्ये ‘भूल भुलैया 3’ प्रदर्शित-

2024 मध्ये ‘भूल भुलैया 3’ प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. या चित्रपटात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालनही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसल्या. आता सर्वांचे लक्ष ‘भूल भुलैया 4’ कडे लागले आहे. जर या चित्रपटात अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन खरोखरच एकत्र दिसले, तर हा चित्रपट फक्त हॉरर आणि कॉमेडीच नव्हे तर बॉलिवूडमधील एक अनोखा ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews