Chhaya Kadam: ‘मी रानडुक्कर खाल्लंय, घोरपड खाल्लीय’, अभिनेत्री छाया कदमच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

Published:
Chhaya Kadam Interview: 'मी रानडुक्कर खाल्लंय, घोरपड खाल्लीय', अभिनेत्री छाया कदमने मुलाखतीत केला खुलासा
Chhaya Kadam: ‘मी रानडुक्कर खाल्लंय, घोरपड खाल्लीय’,  अभिनेत्री छाया कदमच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

Chhaya Kadam in RJ Manish Show:   मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमठवणारी अभिनेत्री म्हणजे छाया कदम होय. छाया कदम सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या चाहत्यांनासुद्धा त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता पुन्हा एकदा छाया कदम चर्चेत आल्या आहेत. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमुळे छाया कदम यांची जोरदार चर्चा होत आहे. या मुलाखतीत छाया यांनी आपण किती रसिक खवय्ये असल्याचं सांगितलं आहे. परंतु त्यांनी जे सांगितलं त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

 

‘मी कुठलाही प्राणी खाते, मी रान डुक्कर खाल्लाय…. 

 

छाया कदम यांनी नुकतंच रेडिओ मिरचीवर आरजे मनीषच्या लोकप्रिय ‘चटर पटर’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी गप्पा मारत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. या शोमध्ये बोलताना त्यांनी आपल्या खाण्याच्या सवयीबाबत सांगितलं. छाया कदम म्हणाल्या, ‘मी कुठलाही प्राणी खाते, मी रान डुक्कर खाल्लाय. हरणासारखा दिसणारा पिसई नावाचा प्राणी मी खाल्लाय. मी ससा खाल्लाय, शिवाय घोरपडसुद्धा खाल्लीय. पुढे त्या म्हणाल्या मला लोकं म्हणतील ही बाई आहे कि कोण आहे?

छाया म्हणाल्या, आमच्या गावात बायकांना साळींदर खाण्यास मनाई आहे. परंतु मला जी गोष्ट करू नको असं म्हंटल जातं ती करण्यात जास्त रस असतो. परंतु , मी भारताबाहेर गेले आणि तिथे मला कोणी सांगितलं कि हा साप आहे तो खा किंवा हा दुसरा डुक्कर आहे तो खा तर नाही. मी नाही खाऊ शकत. छाया यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय त्यांच्या खवय्ये वृत्तीवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. छाया कदम मासासुद्धा आवडीने खातात. याबाबतसुद्धा त्यांनी सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mirchi Marathi (@mirchimarathi)

छाया कदम यांना आवडतात मासे-

छाया पुढे म्हणतात, मला पापलेट, सुरमई, रावस हे मासे आवडतात. परंतु मी गावी गेल्यांनतर असे मासे आवडीने खाते ज्यांची तुम्हाला नावेही माहिती नसतील जसे कि हापी, काळुंद्रा. आई सांगायची मासे आकाराने जितके छोटे असतात तितके ते चवीला भारी असतात. मासा काटेरी असेल तर तो चवीला जास्त चांगला असतो’. छाया कदम यांच्या या मुलाखतीची आता चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews