बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra News) यांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज त्यांची प्रकृती अचानकपणे बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
३१ ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल (Dharmendra News)
८९ वर्षीय धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, हेमा मालिनी यांनी विमानतळावर जनतेला आरोग्यविषयक अपडेट दिले आणि सांगितले की ते बरे आहेत. परंतू, आज सकाळी धर्मेंद्र यांची प्रकृती आणखी बिघडली. धर्मेंद्र यांची प्रकृती अचानकपणे खालावल्या नंतर त्यांच्या जवळचे सहकारी आणि कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत आहेत
सध्या, धर्मेंद्र (Dharmendra News) उपचारांना प्रतिसाद देत आहेत. तथापि, त्यांच्या कुटुंबाने किंवा रुग्णालयाने कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. या वर्षी एप्रिलमध्ये धर्मेंद्र यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. एका डोळ्यात अंधुक दृष्टी असल्याने त्यांचे कॉर्निया प्रत्यारोपण झाले. धर्मेंद्र यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील केली. शस्त्रक्रियेनंतर, ते मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर दिसले. पापाराझींशी बोलताना, ते म्हणाले होते, “माझ्याकडे खूप ताकद आहे.
धर्मेंद्र यांच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, त्याचा वाढदिवस 8 डिसेंबर रोजी आहे. पण या वयातही त्यांनी काम करणे सोडले नाही. त्यांना जमेल त्या ताकदीने काम करताना दिसतात. ते कृती सेनन आणि शाहिद कपूर यांच्या “तेरी बातें में ऐसा उलझा जिया” या चित्रपटात शेवटचे दिसले होते.






