पं. हृदयनाथ मंगेशकर, मंत्री उदय सामंत, पंकज बेरी, अनु अग्रवाल, नायरा एम बॅनर्जी यांना १७व्या न्यूजमेकर अचिवर्स पुरस्काराने सन्मानित

Written by:Astha Sutar
Published:
पं. हृदयनाथ मंगेशकर, मंत्री उदय सामंत, पंकज बेरी, अनु अग्रवाल, नायरा एम बॅनर्जी यांना १७व्या न्यूजमेकर अचिवर्स पुरस्काराने सन्मानित

Achievers Award : दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना आफ्टरनून व्हॉईसकडून न्यूजमेकर अचीवर्स अवॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात येते. दरम्यान, यावर्षी सामाजिक, राजकीय, मनोरंजन, कला, संगीत, पत्रकार आदी क्षेत्रातील लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त याचे औचित्य साधून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आफ्टरनून व्हॉईस प्रस्तुत १७व्या न्यूजमेकर अचिवर्स अवॉर्डचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वैदेही तमन यांनी केले होते.

पुरस्कार मिळणे हा भाग्याची गोष्ट…

दरम्यान,या सोहळ्यात पं. हृदयनाथ मंगेशकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामलाल (मुख्य अतिथी), मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, ‘आशिकी’ चित्रपटातील अभिनेत्री अनु अग्रवाल, नायरा एम बॅनर्जी, अभिनेते पंकज बेरी, स्मिता जयकर, अप्पा परब, जे. वी. पवार, बालकलाकार अयान खान तसेच अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी व मीडिया क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तर “अशा दिग्गजांसमोर सन्मान मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.” असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

पुरस्काराचे मानकरी कोण?

आप्पा परब, स्मिता जयकर, जे. वी. पवार आणि अनु अग्रवाल यांनाही लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आले. डॉ. वेणुगोपाल रामराव (डॉक्टर), पं. विद्याधर मिश्रा (वैदिक आचार्य), यतींद्र कटारिया (हिंदी साहित्य) यांना गौरवण्यात आले. सामाजिक क्षेत्रात IPS संदीप तामगडगे, निवृत्त कर्नल प्रभात सूद (डिफेन्स), महामंडलेश्वर पायल नंदगिरी जी (सामाजिक कार्य), नायरा एम बॅनर्जी (बेस्ट वर्सटाइल अभिनेत्री), अयान खान (बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट), मनोरंजन क्षेत्रात पंकज बेरी (बेस्ट वर्सटाइल अभिनेता), यांना पुरस्कार देण्यात आले. मीडिया क्षेत्रात आशोक श्रीवास्तव यांना बेस्ट अँकरिंग अवॉर्ड आणि सरिता कौशिक (ABP माझा) यांना सन्मान देण्यात आला.

पुढील दहा वर्षांत भारत जगाचे नेतृत्व करेल

पं. हृदयनाथ मंगेशकर यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला, जो उषा ताईंनी त्यांच्या वतीने स्वीकारला. “हृदयनाथ मंगेशकरांचा मला फोन आला होता की, तू हा पुरस्कार स्वीकार”, असे उषा ताईंनी सांगितले आणि डॉ. वैदेहींचे आभार मानले. भारताची संस्कृती जगभर पोहोचावी, एक भारताचा संदेश जावा आणि पुढील दहा वर्षांत भारत जगाचे नेतृत्व करेल, ही दिशा आपण घेऊ या, असे मुख्य अतिथी रामलाल (RSS) यांनी म्हटले.  त्यांना बेस्ट वर्किंग पॉलिटिशियन अवॉर्ड देण्यात आला. स्वीडनचे मुंबईतील कौन्सिल जनरल श्री. स्वेन ऑस्टबर्ग, सोशल उद्योजिका डॉ. नंदिता पाठक आणि समाजसेविका माया राम बहादूर लामा यांनाही गौरवण्यात आले.

डॉ. वैदेही तमन या लेखिका, पत्रकार, समाजसेविका आणि हीलर आहेत. त्यांनी कार्यक्रमाच्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. “आम्ही कुठल्याही प्रायोजकांशिवाय पुरस्कार देतो, ते निव्वळ गुणवत्ता बघून. मी माझं घर गहाण ठेवून वर्तमानपत्र सुरू केलं होतं. आम्ही दरवर्षी १० नवोदित पत्रकार घडवतो. आम्ही समाजातील गुणवंतांना शोधून त्यांना सन्मानित करतो,” असे त्यांनी सांगितले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews