Marathi News

Sanjay Dutt : संजय दत्तचा दारुसाठी हट्ट, स्टारडमचा दबदबा फोटोग्राफर ने सांगितलेला अनोखा किस्सा चर्चेत

Published:
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे संजय दत्त. त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, करिअरमधील प्रचंड यश, प्रामाणिक स्वभाव आणि हट्टी वृत्तीमुळे ‘संजू बाबा’ या नावाने त्यांनी स्वतःची एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली
Sanjay Dutt : संजय दत्तचा दारुसाठी हट्ट, स्टारडमचा दबदबा  फोटोग्राफर ने सांगितलेला अनोखा किस्सा चर्चेत

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे संजय दत्त. त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, करिअरमधील प्रचंड यश, प्रामाणिक स्वभाव आणि हट्टी वृत्तीमुळे ‘संजू बाबा’ या नावाने त्यांनी स्वतःची एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांविषयी लोकांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. त्यातच प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी सांगितलेला एक जुना किस्सा पुन्हा प्रकाशझोतात आला असून, हा प्रसंग संजय दत्तच्या स्वभावाची वेगळी बाजू उघड करणारा ठरतो.

संजू बाबाची खास स्टाईल  फोटोग्राफर्सला दारूसाठी हट्ट

वरिंदर चावला यांच्या आठवणीतला एक प्रसंग विशेष चर्चेत आला आहे. संजय दत्त अनेकदा शूटिंगदरम्यान फोटोग्राफर्सना जवळ बोलवायचे आणि अगदी सहजतेने त्यांना विचारायचे, “दारू पिता का?”
फोटोग्राफर्स कामात असल्याने किंवा दारू न पिणारे असल्याने नकार देण्याचा प्रयत्न करत; पण संजय दत्तचा आग्रह इतका ठाम असायचा की ग्लास हाती घेण्याशिवाय पर्यायच नसे. त्यांच्या स्टारडमचा प्रभाव असा होता की, त्यांच्या बोलण्याला नकार देण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. चावला म्हणतात, “आम्ही नकार देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी त्यांच्या आग्रहामुळे आम्हाला बसावंच लागायचं. तो जितका हट्टी, तितकाच दिलखुलास होता.”

वॅनिटी व्हॅनसमोरचा विस्मरणात गेलेला प्रसंग ( Sanjay Dutt)

चावला यांनी सांगितलेला दुसरा प्रसंग संजय दत्तच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू समोर आणतो. करिअरच्या सुरुवातीला ते सेकंड हँड मारुती झेन कार वापरत होते. फिल्मिस्तान स्टुडिओच्या आवारात एकदा संजय दत्तच्या शूटिंगदरम्यान ते फोटो काढून निघत असताना चुकून त्यांच्या कारने संजय दत्तच्या वॅनिटी व्हॅनला हलकी धडक दिली. ही घटना पाहताच संजय दत्तच्या टीमने चावला यांना वेढा घातला आणि नुकसानभरपाईची मागणी करायला सुरुवात केली. याच वेळी स्वतः संजय दत्त बाहेर आले. त्यांनी शांतपणे काय घडले ते ऐकून घेतले आणि आपल्या लोकांना रोखत स्पष्ट शब्दांत सांगून टाकले — “त्याला जाऊ द्या. चावला म्हणतात, “त्या क्षणी मला संजू बाबा मोठे स्टार म्हणून नव्हे; तर मोठ्या मनाचा माणूस म्हणून दिसला. Sanjay Dutt

स्टारडम असूनही जमिनीवर पाय

या दोन्ही आठवणींमधून संजय दत्तचा स्वभाव दिसून येतो — कधी हट्टी, कधी बिंदास, पण मनाने अतिशय मोठा आणि परिस्थितीनुसार समजूतदार निर्णय घेणारा. त्याच्या असामान्य स्टारडमच्या पलीकडे तो माणूस म्हणून किती दिलदार आहे, हे या प्रसंगांतून जाणवते.

धुरंधर’च्या यशानंतर नवीन उंची

संजय दत्त सध्या आपल्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या अफाट यशाचा आनंद घेत आहेत. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 1,200 कोटींपेक्षा जास्त कमाई करत विक्रमी कामगिरी केली आहे. प्रेक्षकांना आता या चित्रपटाच्या पुढील भागाची मोठी उत्सुकता आहे आणि 2026 च्या मार्चमध्ये तोप्रेक्षांसमोर येईल अशी चर्चा आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews