Marathi News

आसामला भूकंपाचे जबरदस्त धक्के; तीव्रता 5.1 रिश्टर स्केल, नागरिक भयभीत

Written by:Rohit Shinde
Published:
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आसाम आणि ईशान्य भारतात भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. मोरीगाव केंद्रबिंदू असलेल्या ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
आसामला भूकंपाचे जबरदस्त धक्के; तीव्रता 5.1 रिश्टर स्केल, नागरिक भयभीत

आसामला आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमाराला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरीगाव जिल्ह्याजवळ ५० किलोमीटर खोलवर आहे. हा भाग मध्य आसामचा असून भूकंपात अद्याप कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. भूतान, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारच्या देशांमध्येही भूकपांचे धक्के जाणवले.

आसाम राज्य भुकंपाने हादरलं !

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताला निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला आहे. त्यातच आज पहाटे आसाम आणि आसपासच्या राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. साधारण ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे आसाममधील मोरीगावसह गुवाहाटी आणि मेघालयातील शिलॉन्गपर्यंतची धरती हादरली. पहाटेची वेळ असल्याने आणि धक्के तीव्र असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सोमवारी सकाळी आसाममधील मोरीगाव येथे भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर5.1 इतकी होती. अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) नुसार, आज पहाटे ४:१७ वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्रबिंदू 26.37 उत्तर अक्षांश आणि 92.29 पूर्व रेखांशावर 50 किमी खोलीवर होते.

भूगर्भशास्त्रज्ञांकडून चिंता व्यक्त

नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (NCS) ने दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये आलेल्या भूकंपाची वेळ पहाटे ४ वाजून १७ मिनिटे अशी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात जमिनीखाली ५० किलोमीटर खोलीवर होते. या भूंकपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी असून यामुळे अनेक घरांना तडे गेल्याचेबोललं जात आहे. हा भूकंप होण्याच्या काही मिनिटे आधी म्हणजेच पहाटे ३:३३ वाजता त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यात ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. एकाच पहाटे दोन राज्यांमध्ये झालेल्या या हालचालींमुळे भूगर्भशास्त्रज्ञांकडून चिंता व्यक्त केली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews