आजकाल ATM तर तुमच्या सर्वांकडे असेल.. एटीएम च्या माध्यमातून पैसे काढणे ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. तरुणांसोबत आता प्रौढ व्यक्ती ही अगदी आरामात एटीएम चा वापर करत आहेत. … परंतु एटीएमचा वापर करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो… मित्रानो, ATM मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे ATM PIN.. हा एक ४ अंकी नंबर असतो जो व्यवस्थित टाकला तरच तुमच्या एटीएम मधून पैसे निघत असतात. अशावेळी ATM PIN चे महत्त्व मोठ आहे. सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात सायबर हल्ल्यांचे आणि हॅकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेकदा तर एटीएम पिन हॅक केल्याच्या आणि बँक खाते रिकामे केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील.अशावेळी आपला एटीएम पिन सुद्धा तितकाच मजबूत असला पाहिजे जेणेकरून कोणताही हॅकर तो हॅक करू शकणार नाही….. चला तर मग आज आम्ही तुम्हाला एटीएम पिन बाबत अशाच काही टिप्स देणार आहोत.
1) नेहमीचेच साधे पिन टाळा
सायबर तज्ज्ञांच्या मते, कधी कधी आपण सोप्यात सोपा एटीएम पिन टाकायचा प्रयत्न करतो. कारण आपल्या लक्षात आपला पिन असावा हा आपला विचार असतो… उदाहरणार्थ 1234 हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा आणि सर्वात असुरक्षित पिन आहे.. हा पिन वापरायला आणि लक्षात ठेवायला सोप्पा असल्याने अनेकजण हाच पिन एटीएम साठी ठेवण्यावर भर देतात… मात्र इथेच तुम्ही फसू शकता. यासोबतच 0000 हा पिन सुद्धा धोकादायक मानला जातो. त्यामुळे असे सोप्पे पिन टाळणे गरजेच आहे.
2) एकच अंक पुन्हा पुन्हा नको (ATM PIN)
कधी कधी आपण जास्त टेन्शन नको म्हणून एकच क्रमांक डबल टिबल टाकून पिन तयार करतो. उदाहरणे द्यायची झाल्यास, 1111, 2222, 3333, 4444 किंवा 5555 … परंतु एकाच अंकाची पुनरावृत्ती असलेले पिन कोड सायबर गुन्हेगार प्रथम तपासतात आणि अशा नंबरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. हे पिन सोप्पे असल्याने हॅकरला सुद्धा हॅक करताना जास्त कष्ट घ्यायला लागत नाहीत. त्यामुळे असे पिन त्वरित बदलावेत.
3) अनुक्रमे येणारे क्रमांक टाळा
कधी कधी आपण सोप्यात सोपा पिन टाकण्यासाठी एकसलग नंबर टाकतो.. उदाहरणार्थ, 2345, 4567, 5678, 6789 … परंतु असे एटीएम पिन सायबर गुन्हेगारांना ट्रॅक करणे सोप्पं जाते. त्यामुळे कधीही असे क्रमांक एटीएम पिनसाठी वापरू नयेत.
4) वाढदिवस किंवा गाडीचा नंबर –
अनेकजण एटीएम पिनसाठी (ATM PIN) आपल्या वाढदिवसाची तारीख किंवा गाडीच्या नंबर प्लेटचा क्रमांक टाकतात… उदाहरणार्थ १९९५…. २००१ … परंतु तुमच्या काही जवळच्या आणि ओळखीच्या लोकांना तुमच्याबद्दल माहिती असते.. अशावेळी त्यामुळे असे पिन वापरणे धोकादायक ठरू शकते.. त्यामुळे चुकूनही तुमची वैयक्तिक माहिती दर्शवणारा एटीएम पिन टाकू नका.






