राज्यात पुढील 24 तासासाठी मेघर्जनसह मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट कुठे?

Written by:Astha Sutar
Published:
एकीकडे अवकाळी पावसाने झोडपून काढले असताना आता दुसरीकडे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी. अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे.
राज्यात पुढील 24 तासासाठी मेघर्जनसह मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट कुठे?

State Rain – पावसाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मागील १५ दिवसांपासून राज्यातील काही भागात सुसाट्याचा वादळी वारा आणि गारपीठसह पावसाने दमदार हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासासाठी मेघर्जनसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यात?

दरम्यान, गेल्या १५ दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर आता 21 मे ते 24 मे पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता यानंतर आता पुढील 24 तासात काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गध्ये तर बुलढाणा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान …

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं उत्तर महाराष्ट्र, कोकण, प. महाराष्ट्र या ठिकाणी हाता तोंडाशी आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. मुसळधार पावसाच्या हजेरीमुळं राज्यातील विविध भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात केळी, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचं मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकमध्ये द्राक्षे, कांद्याचे नुकसान झालेय. तर कोकणाच आंब्याचे मोठे नुकसान झालेय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुले लोकांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews