आधीच लावलेल्या FASTag मध्ये Annual Pass कसा अ‍ॅक्टिवेट कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Published:
आधीच लावलेल्या FASTag मध्ये Annual Pass कसा अ‍ॅक्टिवेट कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

सामान्य नागरिकांची प्रवासाची सोय आणि खर्च वाचवण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहनांसाठी 3,000 रुपयांचा वार्षिक FASTag पास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असून, वर्षभरात 200 ट्रिप्सपर्यंत कोणत्याही टोलवर पैसे भरावे लागणार नाहीत.

काय आहे वार्षिक FASTag पास?

हा पास खासगी कार, जीप किंवा व्हॅनसाठी लागू असेल आणि तो एक वर्ष किंवा 200 प्रवासांपर्यंत (जे आधी पूर्ण होईल) वैध असेल. या कालावधीत FASTag वापरकर्त्यांना टोल फी भरावी लागणार नाही. हा पास राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवे (NE) वरील विशिष्ट टोल प्लाझांवर लागू असेल.

FASTag पास कसा विकत घ्यायचा?

हा पास NHAI च्या अधिकृत वेबसाइटवर आणि ‘हायवे यात्रा’ मोबाइल अॅपवर 15 ऑगस्ट 2025 पासून उपलब्ध होईल. वापरकर्त्यांना तिथेच 3,000 रुपये भरून पास खरेदी करता येईल.

पास कसा होईल अ‍ॅक्टिवेट?
  1. वाहन आणि त्यावर आधीच असलेल्या FASTag ची पात्रता तपासली जाईल.

  2. यशस्वी पडताळणीनंतर वापरकर्त्यांना 3,000 रुपये भरावे लागतील.

  3. पेमेंट पूर्ण झाल्यावर संबंधित FASTag वर हा वार्षिक पास अ‍ॅक्टिवेट होईल.

  4. पास एक वर्ष किंवा 200 ट्रिप्सपर्यंत वैध असेल.

  5. त्यानंतर तो पास आपोआप नियमित FASTagमध्ये रूपांतरित होईल.

  6. पुन्हा नव्या वर्षासाठी किंवा ट्रिप मर्यादा संपल्यानंतर पास रिन्यू करावा लागेल.

फायदा काय?

या योजनेमुळे वापरकर्त्यांना पुन्हा FASTag रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही, तसेच वारंवार टोलवर पैसे देण्याचा त्रासही होणार नाही. हे वाहनधारकांसाठी मोठे दिलासादायक पाऊल ठरणार आहे

Follow Us :GoogleNews