मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतील महिलांसाठी एक गुडन्यूज आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने सर्व लाडक्या बहिणींना खात्याचे E-Kyc करणे बंधनकारक केलं होते. त्यासाठी वडील किंवा नवऱ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक होते. परंतु ज्या महिलांचे वडील किंवा नवरा आज हयात नाही अशा महिलांची यामुळे अडचण होत होती. या महिलांचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ बंद होतोय कि काय अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता यावर सरकारने महत्वाचा तोडगा काढत E-Kyc ची अट शिथिल केली आहे.
काय आहे निर्णय – Ladki Bahin Yojana
खरं तर लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फायदा अनेक जण पात्र नसताना सुद्धा घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने या योजनेसाठी ही केवायसी करण्याची अट घातली होती. मात्र, ई-केवायसी करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासरपोर्ट साईज फोटो, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागतो. परंतु ज्या महिलांच्या वडिलांचे आणि नवऱ्याचे निधन झालं आहे, त्यांनी काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तोडगा म्हणून सरकारने ईकेवायसी प्रक्रियेत थोडी शिथिलता आणली आहे . ज्या महिलांना पती अथवा वडील नाही त्यांना इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार –
दरम्यान, ऑक्टोबर महिन्याचे १५०० रुपये आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हंटल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!
लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.






