Marathi News

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो नवीन वर्षात PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ही 3 कामे करा

Published:
पीएम किसान  योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ६००० रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याला देण्यात येतात
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो नवीन वर्षात PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ही 3 कामे करा

आज पासून नवीन वर्ष 2026 सुरू झाल आहे. नवीन वर्षा मुळे अनेक नियम बदलले आहेत. गॅस सिलेंडरच्या किमतीपासून ते एटीएम पर्यंत नियमात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे नियम कृषी क्षेत्रातील आर्थिक बाबीं संदर्भात सुद्धा पाहायला मिळतील. शेतकऱ्यांच्या अनेक योजनेमध्ये नवीन वर्षात बदल होत आहेत. यातील शेतकऱ्यांची सर्वात आवडती योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मानित योजना…

पीएम किसान  योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ६००० रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याला देण्यात येतात. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता शेतकरी २२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वर्षातही पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना तीन कामे करावी लागतील अन्यथा त्यांचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे.

शेतकरी ओळखपत्र –

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना  शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलं आहे. पीएम किसान योजनेत अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी चुकीची नोंदणी, अपूर्ण कागदपत्रे आणि अपात्र लाभार्थी यांची संख्या वाढल्याचे आढळून आले होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने नियम कडक करत शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केला आहे. हे ओळखपत्र नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता मिळणार नाही.

ई केवायसी – PM Kisan Yojana

जर तुम्हाला नवीन वर्षात सुद्धा पीएम किसान योजनेचे पैसे हवे असतील तर सर्वात आधी तुमची ई केवायसी करावी लागेल. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची ई केवायसी केली नसल्याने मागील काही हप्ते मिळालेले नाहीत. अशावेळी नवीन वर्षात पीएम किसान योजनेचे पैसे हवे असतील तर शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आधार-आधारित ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचं आहे.  PM Kisan Yojana

जमिनीच्या नोंदी-

शेवटची गोष्ट म्हणजे जमिनीच्या नोंदी. शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या शेतीच्या जमिनीची माहिती पोर्टलवर अचूक आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे. वारसाहक्क, नोंद दुरुस्ती किंवा नावातील फरक असल्यास पीएम किसान योजनेचा हप्ता अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक तलाठी किंवा महसूल कार्यालयात जाऊन जमिनीच्या नोंदी तपासा आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्या.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews